IDBI Bank Recruitment 2025 Canva
अर्थभान

IDBI Bank Recruitment 2025 : 676 ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांची भरती; जाणून घ्या पात्रता, अर्ज भरण्याची अंतिम तारीख

IDBI Bank Recruitment 2025 |IDBI बँकेने गुरुवारी म्हणजेच 8 मे 2025 पासून 676 Junior Assistant Manager (JAM) पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

shreya kulkarni

IDBI Junior Assistant Manager Recruitment Notification 2025:
नवी दिल्ली : IDBI बँकेने आजपासून म्हणजेच 8 मे 2025 पासून 676 Junior Assistant Manager (JAM) पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी बँकेने संपूर्ण देशभरात JAM Grade ‘O’ पदांसाठी ही भरती जाहीर केली होती. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IDBI JAM भरती 2025: (Last Date of Application)

IDBI बँकेने 8 मे 2025 पासून Junior Assistant Manager JAM Grade ‘O’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे जाहिरात क्र. 03/2025-26 अंतर्गत 676 जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी निवड प्रक्रिया

ऑनलाइन टेस्ट (OT),

कागदपत्र पडताळणी (DV),

वैयक्तिक मुलाखत (PI) आणि

पूर्व भरती वैद्यकीय चाचणी (PRMT) वर आधारित असेल.

लेखी परीक्षा 8 जून 2025 रोजी देशभरात होणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना Class A city मध्ये CTC रु. 6.14 लाख ते 6.50 लाख दरम्यान पगार मिळेल.

ऑनलाईन चाचणीचे स्वरूप:

IDBI बँक भरती 2025 महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्जाची सुरुवात - 8 मे 2025

अर्जाची अंतिम तारीख- 20 मे 2025

लेखी परीक्षा- 8 जून 2025

रिक्त जागांचा तपशील:

Junior Assistant Manager (JAM): 676 पदे

पात्रता अट:

  • शैक्षणिक पात्रता:
    कोणत्याही शाखेतील स्नातक पदवी आवश्यक (General/EWS/OBC – 60%, SC/ST/PwBD – 55%)
    फक्त डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत.

  • कंप्युटर साक्षरता आवश्यक

  • वय मर्यादा:

    किमान वय: 20 वर्षे

    कमाल वय: 25 वर्षे

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.idbibank.in

  2. मुख्यपृष्ठावरील “IDBI Bank Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा

  3. आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा

  4. संबंधित कागदपत्रे अपलोड करा

  5. अर्जाची प्रिंटआउट प्रत भविष्यासाठी जतन करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT