Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold-Silver Rate: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर सोन्याचे भाव कोसळले; तुमच्या शहरात काय आहे भाव?

Gold-Silver Rate: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढला असून त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold-Silver Rate Today: आज 18 मे रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. युद्ध भडकण्याची शक्यता आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच कॉमेक्स (Comex) वर आज सोन्याच्या किंमतीत 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर चांदी जवळपास 2.7 टक्क्यांनी घसरली आहे. याचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजार आणि एमसीएक्स (MCX) वायदा बाजारावर झाला आहे.

ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणला थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, “इराणसाठी वेळ कमी आहे. त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर त्यांच्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही.” या वक्तव्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे.

दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेच्या दबावासमोर झुकण्यास नकार दिला आहे. इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते मध्य पूर्वेतील अमेरिकन आणि सहयोगी देशांच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.

आजचे सोन्याचे दर काय?

भारतीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर शहरानुसार असे आहेत:

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,57,070, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,43,990, तर 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,840 आहे.

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,56,920, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,43,840, तर 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,769 इतका आहे.

पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,56,920, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,43,840, तर 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,769 इतका आहे.

चांदीतही चढ-उतार

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठे चढ-उतार दिसत आहेत. जागतिक पातळीवरील तणाव आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे चांदीवरही दबाव निर्माण झाला आहे.

गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?

तज्ज्ञांच्या मते, सध्या सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता दिसू शकते. मध्य पूर्वेतील परिस्थिती, अमेरिका-इराण तणाव आणि डॉलरच्या हालचाली यावर पुढील दर ठरणार आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT