Gold-Silver Price Crash Pudhari
अर्थभान

Gold-Silver Price Crash: सोना-चांदीचे भाव कोसळले! चांदी 24 हजारांनी स्वस्त, सोन्यातही 4,500 ची घसरण; नेमकं काय घडलं?

Gold Silver Price Crash Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी सोना-चांदीच्या भावात अचानक मोठी घसरण झाली. MCX वर चांदी तब्बल 24 हजारांनी स्वस्त झाली, तर सोन्याचाही दर 4,500 हून अधिक घसरला.

Rahul Shelke

Gold Silver Price Crash Today: गेल्या दोन दिवसांच्या तेजी नंतर गुरुवारी सोन्या चांदीच्या भावात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये जोरदार विक्री झाली. Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदी तब्बल 24 हजार रुपयांनी स्वस्त झाली, तर सोन्याच्या भावात एका झटक्यात 4,500 रुपयांहून अधिक घट झाली.

चांदीच्या किमतीही मोठ्या प्रमाणावर घसरल्या. एमसीएक्सवर 5 मार्च एक्सपायरीची 1 किलो चांदी बुधवारी 2,68,850 रुपयांवर बंद झाली होती. मात्र गुरुवारी बाजार उघडताच ती थेट घसरून 2,44,654  रुपयांपर्यंत आली. म्हणजेच एका झटक्यात चांदी जवळपास 24,196 रुपयांनी स्वस्त झाली.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 29 जानेवारीला चांदीने विक्रमी 4 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता आणि 4,20,048 रुपये प्रति किलो असा ‘लाईफटाईम हाय’ गाठला होता. त्यानंतर मात्र दर सतत घसरत गेले. सध्याच्या भावाशी तुलना केली तर चांदी आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल 1 लाख 75 हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे.

सोन्याचाही जवळपास असाच प्रवास दिसून येतो. गुरुवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरातही जोरदार घसरण झाली. एमसीएक्सवर 2 एप्रिल एक्सपायरीचे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने बुधवारी 1,53,046 रुपयांवर बंद झाले होते. मात्र गुरुवारी सकाळी ते थेट 1,48,455 रुपयांवर आले. म्हणजेच अवघ्या काही मिनिटांत सोने सुमारे 4,591 रुपयांनी स्वस्त झाले.

सोन्यानेही 29 जानेवारीला विक्रमी पातळी गाठली होती. त्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,93,096 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सातत्याने दर घसरत गेले. सध्याच्या भावाशी तुलना केली तर सोने आपल्या उच्चांकापेक्षा सुमारे 44,600 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरची ताकद, कच्च्या तेलाचे भाव आणि गुंतवणूकदारांची प्रॉफिट बुकिंग, या सगळ्या कारणांमुळे सोना-चांदीवर दबाव आल्याचं तज्ज्ञ सांगतात. मागील काही दिवसांत झालेल्या वाढीनंतर अनेक गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करायला सुरुवात केल्यानेही ही घसरण वाढली आहे.

थोडक्यात सांगायचं तर, दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीत पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दरांमधील हे चढ-उतार पाहता गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

(टीप: सोनं-चांदी किंवा गोल्ड-सिल्व्हर ETF मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT