Gold Silver Rate Today May 12, 2026: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. सोने थोडे घसरले असले तरी चांदीत जोरदार वाढ झाली आहे. एमसीएक्सवर (MCX) दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी दिसून आली.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारावरही झाला. तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹1,55,300 प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला. तर चांदीचा भाव वाढून ₹2,65,000 प्रति किलोपर्यंत पोहोचला. दुसरीकडे एमसीएक्सवर चांदीने तब्बल ₹16,097 ची वाढ घेतली आणि ती ₹2,78,019 प्रति किलोवर ट्रेड होत होती. सोन्यातही ₹1,097 ची वाढ झाली आहे.
तज्ज्ञ सांगतात की, लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने चांदीची किरकोळ मागणी वाढली आहे. त्यामुळे चांदीच्या दरांना चांगला आधार मिळाला. मात्र सोन्यावर जागतिक घडामोडींचा दबाव कायम आहे.
आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,52,280 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,600 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,14,250 इतका होता.
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,52,130 प्रति 10 ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,450 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,14,100 इतका होता.
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1,52,130 प्रति 10 ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,450 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,14,100 इतका होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिका-इराण चर्चेत अडथळे आल्यामुळे बाजारातील तणाव वाढला आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी म्हणाले की, वाढत्या महागाईच्या भीतीमुळे आणि तेलाच्या किंमतींमुळे गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत.