Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: सोन्या चांदीचे दर पुन्हा कोसळले! मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोनं किती रुपयांवर? पुढे आणखी स्वस्त होणार?

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरातील घसरण 20 नोव्हेंबरलाही कायम असून, दिल्लीच्या सराफा बाजारात सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरू असून, आज 20 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर खाली आले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,30,830 रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईमध्ये हाच दर 1,30,680 रुपये आहे.

विशेष म्हणजे, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग आठव्या दिवशी घसरण झाली आहे. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात एका दिवसात 1,300 रुपयांची घट झाली. मजबूत झालेला रुपया आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याची शक्यता ही या घसरणीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. सध्या स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 3,614.59 डॉलरवर आहे.

मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

20 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,30,830 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,19,940 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,680 रुपये असून, 22 कॅरेट सोन्यासाठी 1,19,790 रुपये मोजावे लागत आहेत.

चेन्नईमध्येही 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,680 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,19,790 रुपये आहे. पुणे आणि बंगळुरूमध्येही जवळपास हेच दर आहेत.

चांदीच्या दरातही घसरण सुरूच

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो 1,79,900 रुपयांवर आला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात एका दिवसात चांदीच्या दरात 2,500 रुपयांची घट झाली आहे.

विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने देशांतर्गत बाजारात प्रति किलो 4 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर प्रति औंस 42.86 डॉलरवर आहे. त्यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सध्या घसरणीचे चित्र पाहायला मिळत आहे.

नोंद: प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी सराफानुसार दर बदलू शकतात. तसेच या दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT