Gold Silver Price Crash Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Crash: सोन्या–चांदीचे भाव कोसळले! चांदी 15 हजारांनी स्वस्त, सोन्यातही मोठी पडझड, काय आहे भाव?

Gold Silver Rate Today: MCX वर चांदी तब्बल ₹15,000 प्रति किलोने घसरली असून सुमारे 6% लोअर सर्किट लागलं आहे. सोन्याच्याही किमतीत जवळपास 0.8% घट होऊन भाव 1.50 लाखांच्या आसपास आले आहेत.

Rahul Shelke

Why Gold Silver Price Crash Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदी तब्बल 15 हजार रुपये प्रति किलोने घसरली. चांदीचा भाव खाली येत 2,29,872 रुपयांवर पोहोचला असून सुमारे 6 टक्क्यांचे लोअर सर्किटही लागले आहे.

सोन्याच्याही भावात घट झाली आहे. MCX वर सोन्याच्या किमतीत जवळपास 0.8 टक्क्यांची घसरण झाली असून 10 ग्रॅम सोनं सुमारे 1,50,675 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोन्या चांदीने उच्चांक गाठला होता.

मात्र आता त्या पातळीवरून दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी पडझड झाली आहे. एप्रिल 2026 एक्सपायरीचा गोल्ड फ्युचर्स करार आधीच आपल्या विक्रमी स्तरापेक्षा जवळपास 28 हजार रुपयांनी खाली आला होता. त्याचप्रमाणे चांदीही आपल्या ‘ऑल टाइम हाय’ पासून सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे.

भाव का कोसळले?

तज्ज्ञांच्या मते, सोन्या–चांदीतील घसरणीचं मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हं. दोन्ही देशांमध्ये अणुकराराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्यामुळे जागतिक बाजारात भीतीचं वातावरण काहीसं निवळलं आहे.

यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या–चांदीऐवजी डॉलरकडे वळताना दिसत आहेत. डॉलर मजबूत झाला की सहसा सोनं आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो आणि सध्या तेच घडत आहे.

बाजारतज्ज्ञ सांगतात की मागील काही आठवड्यांत धातूंमध्ये मोठी तेजी आली होती. आता ही तेजी कमी होत असून भाव हळूहळू खाली येत आहेत. काही तज्ज्ञांनी तर पुढील काळात किमती आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

थोडक्यात सांगायचं तर, सध्या सोन्या–चांदीत मोठी अस्थिरता आहे. ज्यांनी जास्त दरात खरेदी केली होती, ते गुंतवणूकदार संधी मिळेल तेव्हा नफा वसुलीकडे वळू शकतात. पुढील काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि डॉलरची हालचाल यावरच या किमतींची दिशा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT