Gold-Silver Rate Today Pudhari
अर्थभान

Gold-Silver Rate Today: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; चांदीची चमकही वाढली, काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today In India: सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोने ₹ 10 ने तर चांदी ₹ 100 ने महागली आहे.

Rahul Shelke

Source: www.goodreturns.in

Gold Rate Today In India: सोन्याची आणि चांदीची चमक पुन्हा वाढत आहे. आज देशभरात सोन्याचे भाव वाढले असून चांदीनेही त्याच दिशेने वाटचाल केली आहे. जागतिक बाजारात डॉलरच्या वाढीमुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे या दरवाढीला थोडा ब्रेक बसला असला तरी, भारतातील सराफा बाजारात पुन्हा वाढ दिसू लागली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹ 10 ने वाढला आहे, तर 22 कॅरेट सोनेही ₹ 10 ने महागले आहे. दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या भावात एकूण ₹180 आणि 22 कॅरेट सोन्याच्या भावात ₹160 ची वाढ झाली आहे.

Gold Rate Today In India

चांदीतही वाढ झाली

गेल्या सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर आता चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये एक किलो चांदीच्या भावात दोन दिवसांत तब्बल ₹2,100 ची वाढ झाली आहे. आज (4 नोव्हेंबर) रोजी दिल्ली बाजारात एक किलो चांदी ₹1,54,100 दराने विकली जात आहे. आज भाव प्रति किलो ₹100 ने वाढला आहे.

मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचे भाव याच स्तरावर आहेत, तर चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक महाग प्रति किलो ₹1,68,100 दराने विकली जात आहे. त्यामुळे चार प्रमुख महानगरांमध्ये चेन्नईमध्ये सध्या सर्वात महाग चांदी आहे.

सोन्या–चांदीचे भाव कितीपर्यंत वाढू शकतात?

OANDA चे सीनियर मार्केट अ‍ॅनालिस्ट केल्विन वॉन्ग यांच्या मते, डॉलर अजूनही मजबूत स्थितीत आहे आणि त्यामुळे सोन्यातील तेजी मर्यादित राहण्याची शक्यता आहे. Augmont Goldtech च्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव डॉलर 3,920 ते डॉलर 4,060 प्रति औंस (भारतीय बाजारात अंदाजे ₹1.19 लाख ते ₹ 1.22 लाख प्रति 10 ग्रॅम) दरम्यान स्थिर आहेत. चांदी डॉलर 46 ते डॉलर 49 प्रति औंस म्हणजेच ₹1.4 ते ₹1.5 लाख प्रति किलो दरम्यान आहे.

जर या स्तरांपेक्षा भाव वर गेले, तर सोन्या–चांदीत आणखी 3 ते 5 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. निर्मल बँग सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष कुणाल शाह यांच्या मते, एमसीएक्सवर सोने लवकरच प्रति 10 ग्रॅम ₹1.23 लाखांपर्यंत पोहोचू शकते. जागतिक स्तरावर सोन्याचे भाव डॉलर 4,200 पर्यंत जाऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT