सोने ७५ हजार पार झाले आहे. (file photo)
अर्थभान

Gold Price Today : दोन दिवसांत सोने- चांदी दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

प्रति तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सकारात्मक जागतिक संकेत आणि स्थानिक स्पॉट मार्केटमधील मजबूत मागणीच्या जोरावर सोन्याने (Gold Rate Today) पुन्हा उसळी घेतली आहे. सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे ७३२ रुपयांनी वाढला. तर चांदीचा दर एका दिवसात किलोमागे १,५५४ रुपयांनी वाढला. २४ कॅरेट (शुद्ध सोने) चा दर आज प्रति १० ग्रॅम ७५,५४० रुपयांवर खुला झाला. काल तो ७४,८०८ रुपयांवर बंद झाला होता. चांदीचा दर प्रति किलो ८९,२८९ रुपयांवरुन ९०,८४३ रुपयांवर पोहोचला.

Gold Price Today : जाणून घ्या आजचे दर

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७५,५४० रुपये, २२ कॅरेट ६९,१९५ रुपये, १८ कॅरेट ५६,६५५ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४४,१९१ रुपयांवर खुला झाला. तर शुद्ध चांदीचा दर प्रति किलो ९०,८४३ रुपयांवर खुला झाला.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सोन्याने प्रति १० ग्रॅम ७९,६८१ रुपयांचा आणि चांदीने प्रति किलो ९९,१५१ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.

दोन दिवसांत सोन्याच्या दरात १,४८० रुपयांची वाढ

एमसीएक्सवर आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७५,४०० रुपयांवर खुला झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ९१,९०५९ रुपयांवर खुला झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांत सोन्याच्या दरात १,४८० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर प्रति किलोमागे २,७०० रुपयांनी वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT