Gold Price  Pudhari
अर्थभान

Gold Price Record: गुंतवणूकदारांनो सावधान! सोन्याचा भाव इतिहास रचणार; पुढच्या 7 दिवसांत 5,000 रुपयांची वाढ होणार?

Gold Price New Record Expected Rise: सोन्याच्या किमतीत मागील आठवड्यात जवळपास 3% वाढ झाल्यानंतर या आठवड्यातही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rahul Shelke

Gold Price Set to Hit New Record: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांत जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोने तब्बल 3 टक्क्यांनी महागले आणि आता विश्लेषकांचा अंदाज आहे की येत्या आठवड्यात सोनं पुन्हा इतिहास रचू शकतं. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भावात किमान 5,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी मोठी वाढ होऊ शकते.

या तेजीमागे सेंट्रल बँकांची सततची खरेदी, भारतातील लग्नसराईमधील वाढती मागणी, अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या शक्यता आणि जागतिक भू-राजकीय तणाव हे प्रमुख घटक असल्याचं मानलं जात आहे.

सोने पुन्हा लाइफटाइम हायकडे?

ऑक्टोबरमध्ये सोन्याने वायदा बाजारात 17 ऑक्टोबर रोजी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. आता 6–7 आठवड्यांनंतर पुन्हा एकदा सोने त्या पातळीवर जाण्याची चिन्हं दिसत आहेत. मागील वर्षभरात सोने 60 टक्क्यांहून अधिक महागलं असून, गुंतवणूकदारांचा कल अजूनही ‘सेफ हेवन’ म्हणजेच सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढत आहे.

तज्ज्ञांचे मत: फेड आणि RBI वर सगळ्यांची नजर

जेएम फायनान्शियलचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, सोनं आता दीर्घकाळाच्या रेंजमधून बाहेर पडले असून पुढील आठवड्यात त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्यांचे म्हणणे आहे की सोन्याच्या भावावर पुढील गोष्टींचा मोठा प्रभाव असेल —

  • अमेरिकेचे रोजगार व उत्पादनसंबंधी आकडे

  • फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांचे भाषण

  • रशिया–युक्रेन युद्धविराम चर्चा

  • आणि शुक्रवारची RBI ची मौद्रिक धोरण बैठक

या सर्व कारणांमुळे पुढील आठवडा सोन्याच्या मार्केटसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

भारतामधील सोन्याच्या किमती वाढवणारे घटक

एमसीएक्सवर गेल्या आठवड्यात फेब्रुवारी 2026 चा सोन्याचा वायदा 3,654 रुपये (2.9%) वाढून 1,29,504 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. एंजल वनचे विश्लेषक प्रथमेश माल्या म्हणतात —

  • रुपयाची घसरण

  • लग्नसराईत वाढलेली मागणी

  • सेंट्रल बँकांची आक्रमक खरेदी

  • आणि ज्वेलरी सेक्टरमधील सततची मागणी

या सर्व घटकामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.

चांदीने तर सोन्यालाही टाकलं मागे

गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर चांदी 10.8% वाढली, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीने 13% ची वाढ घेत विक्रमी पातळी गाठली. चांदीच्या आक्रमक तेजीमुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

5,000 रुपयांची वाढ होणार? विश्लेषकांचे उत्तर

या वेल्थ ग्लोबल रिसर्चचे संचालक अनुज गुप्ता यांच्या मते —

  • फेडकडून दरकपातीचा वाढता अंदाज

  • जागतिक तणाव

  • आणि भारतीय बाजारातील प्रचंड डिमांड

या सर्व गोष्टींमुळे या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 4% म्हणजेच सुमारे 5,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ होऊ शकते.

सोनं पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. जागतिक तणाव, फेडच्या अपेक्षा आणि भारतीय बाजारातील मागणी या तीन घटकांमुळे पुढील आठवडा सोन्याच्या बाजारासाठी सर्वाधिक ‘हाय वोलॅटाइल’ ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT