Gold Rate Today Pudhari
अर्थभान

Gold Rate Today: सोन्याचे भाव वाढले की घसरले? 10 ग्रॅमचा भाव किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Rate Today India: देशातील सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबई व पुण्यात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव घसरले आहेत.

Rahul Shelke

Gold Silver Rate Today:: देशातील सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज 4 डिसेंबरच्या व्यवहारात सोने स्वस्त झाले असून चांदीचे भावही कमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चांदीत वाढ होत होती, पण आज त्या वाढीला ब्रेक लागला आहे.

सध्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या ताज्या किमती बाजारात अपडेट झाल्या आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मागणी वाढलेली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे भावात घसरण झाली आहे.

दिल्ली

  • 24 कॅरेट – ₹1,30,510

  • 22 कॅरेट – ₹1,19,650

  • 18 कॅरेट – ₹97,930

मुंबई

  • 24 कॅरेट – ₹1,30,360

  • 22 कॅरेट – ₹1,19,500

  • 18 कॅरेट – ₹97,780

पुणे

  • 24 कॅरेट – ₹1,30,360

  • 22 कॅरेट – ₹1,19,500

  • 18 कॅरेट – ₹97,780


सोन्याच्या भावात चढ-उतार का होत आहेत?

जागतिक बाजारातील आर्थिक घडामोडी, युद्धासारखी परिस्थिती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, व्याजदर, आयात शुल्क आणि स्थानिक मागणी या घटकांनुसार सोन्याचे भाव सतत बदलत असतात. तरीही सोन्याला भारतात ‘सेफ हेवन’ गुंतवणूक मानले जाते.

बाजारातील अस्थिरतेत सोनं पोर्टफोलिओला स्थिरता देतं, अशी गुंतवणूकदारांची धारणा आहे. शिवाय भारतात सोने हे फक्त गुंतवणूक नसून सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला धागा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT