Source: www.goodreturn.in
Gold-Silver Rate Today: डॉलरची सतत वाढणारी किंमत आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ दिसून येत आहे. काल भावात वाढ झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सध्या गुंतवणूकदार सावध भूमिकेत आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹10 नी, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹10 नी घसरला आहे. म्हणजेच दोन दिवसांत 24 कॅरेट सोनं एकूण ₹710 नी, आणि 22 कॅरेट सोनं ₹660 नी स्वस्त झालं आहे.
सोन्यासोबतच चांदीतही सतत घसरण दिसून येत आहे. एका दिवसाच्या वाढीनंतर दिल्ली बाजारात चांदी एकूण ₹3,100 प्रति किलोनी कमी झाली आहे. आज 5 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये चांदीचा भाव ₹1,50,900 प्रति किलो झाला आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी याच दराने विकली जात आहे. तर चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक महाग असून, तेथे ती ₹1,64,900 प्रति किलो दराने विकली जात आहे.
OANDA चे वरिष्ठ बाजार विश्लेषक केल्विन वोंग यांनी सांगितले की, “डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $3,920 ते $4,060 प्रति औंस (अंदाजे ₹1.19 ते ₹1.22 लाख प्रति 10 ग्रॅम) या रेंजमध्ये आहे.''
निर्मल बँग सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट कुणाल शाह यांच्या मते, “जागतिक बाजारात थोडी स्थिरता आल्यास सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते. एमसीएक्सवर सोने ₹1.23 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते, तर जागतिक स्तरावर त्याची किंमत $4,200 प्रति औंस या पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.”