Gold-Silver Rate Pudhari
अर्थभान

Gold Price Update: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सोन्यात 3,000 तर चांदीत 5,000 रुपयांची वाढ; आता खरेदी करायची की थांबायचं?

Gold Price Today: अमेरिकेतील व्याजदर वाढीबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Price Today: काही दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात आता पुन्हा वाढ झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या व्याजदरांबाबतच्या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी दिसून आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स (COMEX) वर सोन्याच्या दरात तब्बल 61 डॉलर प्रति औंसची वाढ झाली आणि ते 4,187 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. चांदीच्याही दरात वाढ होऊन ती 62.81 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. या वाढीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला.

शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात सुमारे 3,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांहून अधिक प्रति किलो वाढ झाली. जून तिमाहीत मोठी घसरण झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी बाजारातून माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा खरेदीचा कल वाढताना दिसत आहे.

MCX वर काय राहिले दर?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने शुक्रवारी 1,47,200 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर बंद झाले. व्यवहारादरम्यान त्याने 1,47,907 रुपयांचा उच्चांक गाठला. तर सप्टेंबर डिलिव्हरीची चांदी 2,37,410 रुपये प्रति किलो या दरावर बंद झाली. दिवसभरात चांदीने 2,38,876 रुपयांचा उच्चांकही गाठला.

IBJA चे नवे दर

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने जाहीर केलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,344 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. 22 कॅरेट सोने 1,34,051 रुपये, तर 18 कॅरेट सोने 1,09,758 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने व्यवहारात होते. चांदीचा दरही वाढून 2,33,858 रुपये प्रति किलो झाला आहे.

दर वाढण्यामागचं कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेत व्याजदरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत फेडरल रिझर्व्हच्या नव्या अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पुन्हा गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. त्याचाच परिणाम जागतिक तसेच भारतीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतींवर दिसत आहे. मात्र, सोन्या-चांदीच्या दरात पुढेही चढ-उतार सुरू राहू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करा आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT