Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: एका दिवसात सोन्याच्या भावात 1,900 रुपयांची वाढ; चांदीच्या दरात मात्र घसरण, जाणून घ्या आजचा भाव काय आहे

Gold Silver Price Today: 10 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली असून, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,50,870, तर मुंबई आणि पुण्यात ₹1,50,720 प्रति 10 ग्रॅम आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: देशात सोन्याच्या दरातील वाढ कायम असून, आज 10 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,870 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर मुंबईत 1,50,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. डॉलरच्या किमतीत झालेली घसरण आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दराला आधार मिळत आहे.

एका दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ

दिल्लीतील सराफा बाजारात एक दिवस आधी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1,900 रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,194.36 डॉलर प्रति औंस आहे. गेल्या एका आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत 1.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मात्र, पुढील काळात सोन्याचे दर एका मर्यादेत राहू शकतात. त्यात थोडी वाढ होण्याची शक्यताही आहे. मिरे ॲसेट शेअरखानचे कमोडिटी विभागाचे प्रमुख प्रवीण सिंह यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्यास सोन्याच्या दरावर दबाव येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकात्यात सोन्याचे दर किती?

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार

दिल्लीतील सोन्याचे दर: दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,870 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई आणि कोलकात्यातील सोन्याचे दर: मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,38,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,50,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरूमधील सोन्याचे दर: पुणे आणि बंगळुरू या दोन्ही शहरांत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,720 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या दरात घसरण; सध्या किती आहे भाव?

सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 2,34,900 रुपये प्रति किलो होता. याच्या एक दिवस आधी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीच्या दरात प्रति किलो 4,500 रुपयांची वाढ झाली होती. या वर्षी जानेवारीमध्ये चांदीचा दर 4 लाख रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या स्पॉट सिल्व्हरचा दर 60.77 डॉलर प्रति औंस आहे.

सोन्या-चांदीच्या दरांवर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो?

देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर केवळ मागणी आणि पुरवठ्यावर ठरत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, डॉलरमधील चढ-उतार, कच्च्या तेलाचे दर आणि गुंतवणूकदारांचा कल यांचाही त्यावर परिणाम होतो.

त्यामुळे सोन्याचे दर वाढत असताना खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे. दागिने खरेदी करताना सोन्याच्या किमतीसोबत घडणावळ आणि करांचाही त्यात समावेश असतो. त्यामुळे शहरानुसार अंतिम किंमती बदलू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT