Gold Rate Today: देशातील सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. आज 6 नोव्हेंबरला दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचे भाव देखील कमी झाले असून, चांदीच्या भावातही घसरण सुरूच आहे.
दिल्लीत सोन्याचे भाव
राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 1,11,490 प्रति 10 ग्रॅम आहे. आज सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यातील भाव
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीनही प्रमुख बाजारपेठांमध्ये 22 कॅरेट सोनं ₹ 1,11,340 प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोनं ₹ 1,21,470 प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे.
पुणे आणि बेंगळुरूमधील सोन्याचे भाव
पुणे आणि बेंगळुरू या दोन्ही शहरांमध्येही भाव जवळपास समानच आहेत. 24 कॅरेट सोनं ₹1,21,470 प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोनं ₹1,11,340 प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या वित्तीय संस्थांनीही पुढील दोन वर्षांसाठी सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत दिले आहेत. गोल्डमन सॅक्सने अंदाज वर्तवला आहे की डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचा भाव 4,900 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तर ANZ बँकेनुसार, 2025च्या मध्यापर्यंत सोनं 4,600 डॉलर प्रति औंस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. डीएसपी मेरिल लिंचचं मत आहे की, “गोल्डमधील वाढ अजून थांबलेली नाही.”
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही सतत घट होत आहे. 6 नोव्हेंबर रोजी देशात चांदीचा भाव ₹1,50,400 प्रति किलो इतका झाला आहे. 5 नोव्हेंबर रोजी इंदौरच्या सराफा बाजारात प्रति किलो ₹ 500 ची घसरण झाली होती.
भारतामधील सोने-चांदीच्या भावावर देशांतर्गत मागणी, डॉलर इंडेक्स, व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली यांचा थेट परिणाम होत असतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा आक्रमक आर्थिक दृष्टिकोन आणि डॉलरची वाढ ही सध्याच्या घसरणीची प्रमुख कारणं मानली जात आहेत.