Gold-Silver Price pudhari photo
अर्थभान

Gold-Silver Price: मोठ्या घसरणीनंतर दोन दिवसात सोनं २४ हजारानं महागलं; जाणकार म्हणतात...

Anirudha Sankpal

Gold-Silver Price: सोने चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानंतर आता सोन्याचे दर पुन्हा जोमाने वाढू लागले आहेत. गेल्या २९ जानेवारी रोजी सोने चांदीचे दर ऐतिहासिक किंमतीला पोहचले होते. मात्र अचानक यामध्ये मोठी घसरण सुरू झाली. सलग चार दिवस सोन्याच्या किंमती वेगाने खाली येत होत्या. मात्र आता या क्रॅशला ब्रेक लागला असून गेल्या दोन दिवसात किंमतीत वेगाने वाढ देखील होत आहे.

सोन्याचे दर गेल्या दोन दिवसात २४ हजारांनी वाढला आहे. तर चांदीचे देखील दर वेगाने वाढत आहेत. जाणकाऱ्यांच्या मते सोन्याच्या दरात येणाघ्या महिन्यात पुन्हा रेकॉर्ड तेजी पहायला मिळणार आहे.

४ दिवस घसरण आता तेजीत

सोने चांदीच्या दरात चार दिवस तुफान घसरणझाली होती. २९ जानेवारी रोजी चांदीची किंमत ही ४ लाख २० हजार ४८ रूपयांपर्यंत पोहचली होती. ती चार दिवसात घसरूण २.२५ लाखापर्यंत कमी आली होती. सोन्याचा दर देखील १.९३ लाखांवरून १.३७ हजारांपर्यंत खाली आला होता.

मात्र गेल्या दोन दिवसात सोन्याचा दर २४ हजार रूपयांनी वाढला असून चांदी देखील जवळपास ६० हजार रूपयांनी वधारली आहे.

बुधवारी सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मंगळवारी देखील १ किलो चांदीची किंमत २ लाख ६८ हजार १५ रूपयांपर्यंत पोहचली होती. तर बुधावारी चांदी प्रतिकिलो २ लाख ८४ हजार ९४ रूपयांपर्यंत पोहचली.

मंगळवारी सोन्याचे १० ग्रॅमचे दर १ लाख ५३ हजार ८०९ रूपये होते. ते वाढून १ लाख ६० हजार ७५५ रूपयांपर्यंत पोहचले.

किंमतींनी वेग पकडला

गेल्या आठवड्यात ऐतिहासिक विक्री झाली होती. त्यानंतर आता सोने आणि चांदीच्या दरात स्थीरता येताना दिसत आहे. आता सोने चांदीचे दर वाढतील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र सोने चांदीच्या बाजारातील अस्थिरता कायम आहे. युबीएसने चार दिवसांची घसरण ही गेल्या १३ वर्षातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगितलं होतं.

जाणकारांच्या मते स्पॉट गोल्डने देखील ५ टक्क्यांची रिकव्हरी केली आहे. तर चांदीत देखील ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. UBS ने सोन्याबाबत सकारात्मकता दाखवली असून त्यांनी सोन्या चांदीच्या बाजारातील तेजी संपुष्टात आणणारी अशी कोणतीही परिस्थिती सध्या अस्तित्वात नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

UBS ने रोज होणारी सोने चांदी मधील घसरण ही सोन्याच्या बाजारातील तेजी संपुष्टात आणू शकत नाही. ज्यावेळी केंद्रीय बँक आपली विश्वसनीयता प्रस्थापित करत नवीन मॉनेटरी पॉलिसीकडे आपला मोर्चा वळवत नाहीत तोपर्यंत सोने चांदीचा बाजार संपुष्टात येत नाही.

घसरणीत खरेदीची संधी

जियोजित इन्वेस्टमेंटचे कमोडिटी रिसर्च हेड हरीश वी यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात घट झाली होती. ही घट शॉर्ट टर्म कारणांमुळे होती.

ऑगमोंटचे रिसर्च हेड रेनिशा चैनानी यांनी अशा प्रकारची अस्थिरता मार्केट गतीमान असताना होणे सामान्य गोष्ट आहे. लाँगटर्ममध्ये परतावा सकारात्मक मिळण्याची शक्यता आहे. सध्याची घसरण ही खरेदीसाठीची एक संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT