Gold Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. 1 एप्रिल 2026 रोजी सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. Indian Bullion Jewellers Association (IBJA) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात एकाच दिवसात तब्बल 2,836 रुपयांची वाढ झाली आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर आता 1,37,005 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे, जो याआधी 1,34,407 रुपयांवर होता. यामुळे सोनं पुन्हा 1.5 लाखांच्या जवळ जात असल्याचं चित्र आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचा दर तब्बल 9,348 रुपयांनी वाढून ₹2,39,483 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. ही वाढ गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला कल, या सर्व घटकांमुळे दर वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत.
IBJA कडून जाहीर केलेले दर हे केवळ बेस रेट असतात. त्यामध्ये GST, मेकिंग चार्ज आणि इतर करांचा समावेश नसतो. तसेच शनिवार-रविवार आणि सरकारी सुट्ट्यांमध्ये हे दर जाहीर केले जात नाहीत.
सोनं आणि चांदीच्या दरातील ही वाढ गुंतवणूकदारांसाठी निर्णायक ठरत आहे. आता पुढील काही दिवसांत जागतिक बाजारातील घडामोडींवर या दरांचा ट्रेंड अवलंबून राहणार आहे. सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, सोनं पुन्हा एकदा ‘सेफ हेवन’ म्हणून चमकत आहे.