Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: एका दिवसात चांदी 5,730 रुपयांनी कोसळली! सोन्यालाही मोठा झटका; आजचा भाव पाहून खरेदीदार खूश

Gold Silver Price Today: 19 ऑगस्टच्या मोठ्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून 24 कॅरेट सोने 800 रुपयांनी स्वस्त होऊन 1,58,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. 19 ऑगस्ट रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, एका दिवसात चांदी तब्बल 5,730 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. काल 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,58,800 रुपये होता. आज त्यात 800 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा भाव 1,58,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1,58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या दरात मोठी घसरण

सोन्यापेक्षा चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. कालच्या तुलनेत चांदी तब्बल 5,730 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज चांदीचा भाव 2,35,000 रुपये प्रति किलोवर आला आहे.

दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये चांदीचा दर 2,35,000 रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच, सोने खरेदी करणाऱ्यांसह चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांनाही आजच्या घसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. सोन्याचा भाव सुमारे एक टक्क्यांनी वाढून 4,361.76 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव 63.33 डॉलर प्रति औंसच्या आसपास स्थिर आहे. मात्र, भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत जास्त घसरण दिसून आली आहे.

सोने स्वस्त का झाले?

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जगभरातील भू-राजकीय अनिश्चिततेमुळे बाजारातील परिस्थिती बदलत आहे. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवरही होत आहे.

भारतात सोन्याची मागणी काहीशी कमी झाल्याने आणि वायदा बाजारातील व्यापाऱ्यांनी आपल्या पोझिशन्स कमी केल्याने भावात घसरण झाली आहे. याशिवाय, देशांतर्गत बाजारात जुन्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यानेही सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.

सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,58,000 रुपये असून, एका किलो चांदीचा भाव 2,35,000 रुपये आहे. मात्र, सोन्या-चांदीचे दर बाजारातील परिस्थितीनुसार दररोज बदलत असतात. त्यामुळे दागिने किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर आणि मेकिंग चार्जेस तपासणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT