FASTag Annual Pass Price Hiked Pudhari
अर्थभान

FASTag Price Hiked: FASTagचा वार्षिक पास महागणार; 1 एप्रिलपासून वाढणार दर, जाणून घ्या नवे नियम

FASTag Annual Pass Price Hiked: 1 एप्रिलपासून FASTagच्या वार्षिक पासची किंमत 3,000 रुपयांवरून 3,075 रुपये करण्यात आली आहे. हा पास 1 वर्ष किंवा 200 टोल पार होईपर्यंत वैध असणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

FASTag Annual Pass Price Hiked: देशभरात महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. National Highways Authority of India (NHAI) ने FASTag वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही नवी दररचना 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे.

किती वाढ झाली?

आतापर्यंत FASTag वार्षिक पास 3,000 रुपयांत उपलब्ध होता. मात्र आता त्यामध्ये 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन किंमत 3,075 रुपये आहे.

FASTag वार्षिक पास म्हणजे काय?

FASTag वार्षिक पास हा एक प्रीपेड टोल प्लॅन आहे, जो वारंवार महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. एकदाच पैसे भरल्यावर वारंवार रिचार्जची गरज नाही. 1 वर्ष किंवा 200 टोल पार होईपर्यंत हा पास वैध (जे आधी पूर्ण होईल ते लागू) असणार आहे.

दरवाढीमागचं कारण काय?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) माहितीनुसार, ही दरवाढ National Highway Fee Rules 2008 अंतर्गत करण्यात आली आहे. सरकारच्या मते, FASTag वार्षिक पासचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतापर्यंत 56 लाखांहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

कोणासाठी लागू?

हा पास फक्त खासगी वाहनांसाठी लागू आहे —

  • कार

  • SUV

  • व्हॅन

हा पास देशभरातील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर वैध आहे.

फायदे काय आहेत?

FASTag वार्षिक पासमुळे प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात —

  • टोलवर थांबण्याची गरज नाही

  • कॅशलेस व्यवहार

  • वेळेची बचत

  • वारंवार रिचार्जची कटकट नाही

कसा घ्याल हा पास?

FASTag वार्षिक पास घेण्याची प्रक्रिया सोपी आहे —

  • Rajmarg Yatra ॲप डाउनलोड करा

  • किंवा NHAI/MoRTH वेबसाइटला भेट द्या

  • वाहनाची माहिती आणि FASTag ID टाका

  • UPI, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे पेमेंट करा

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पास तुमच्या FASTag ID शी लिंक होईल आणि SMS द्वारे व्हेरिफिकेशन केले जाईल.

FASTag च्या वार्षिक पासच्या दरात वाढ झाली असली तरी, वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अजूनही फायदेशीर ठरू शकते. महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्यासाठी FASTag हा महत्त्वाचा पर्याय आहे.

SCROLL FOR NEXT