Copper price prediction 2026 pudhari photo
अर्थभान

Copper price prediction 2026: सोने चांदी नाही तर या धातूची झळाळी करणार मालामाल... जाणकारांनी थेट 'कॅलक्युलेशन'च करून दाखवलं

Anirudha Sankpal

Copper price prediction 2026: गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील सोने चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ उतार झाले आहेत. अनिश्चिततेच्या काळात सोने आणि चांदीने गुंतवणूकदारांना मोठा नफा देखील कमवून दिला आहे. मात्र आता सोने चांदीची ही मक्तेदारी अजून एक धातू मोडून काढण्याच्या तयारीत आहे. जाणकारांनी तसे संकेत देखील दिले आहेत. त्यांना या धातूची किंमत येणाऱ्या काळात दुप्पट होणार असल्याचं सांगितलं.

तांब्याला येणार सोने चांदीपेक्षा जास्त झळाळी

जाणकारांच्या मते AI आणि विद्युतीकरण यांच्या मोठ्या मागणीमुळे हे जग एका मोठ्या कमोडिटी सुपर सायकलच्या तोंडावर उभं आहे. यामुळं तांब्याच्या किंमतीमध्ये मोठी उसळी पहायला मिळेल. इवानहो माईन्सचे सहसंस्थापक आणि सह अध्यक्ष रॉबर्ट फ्रीडलँड यांनी सांगितलं की, तांबे उत्पादन खर्चात वाढ आणि अभूतपूर्व मागणी यामुळं तांब्याच्या किंमती अजून वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२६ मध्ये सौदी अरेबियामध्ये आयोजित फ्युचर मिनरल्स फोरम २०२६ मध्ये बोलताना दिग्गजांनी तांब्याचे एक आशादायी चित्र समोर ठेवलं.

गेल्या पाच वर्षात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास ५३ डॉलग प्रती बॅरलच्या जवळपास स्थीर राहिल्या आहेत. फ्रीडलँड यांनी सांगितलं की याच कालावधीत तांबे धातूच्या किंमती कमी तेजीत देखील सर्वाकालीन उच्च स्तरावर पोहचल्या. त्यांचा दर प्रती मेट्रिक टन १३,४०० डॉलर इतका झाला होता. मात्र यामध्ये अजून तेजी येण्याची शक्यता आहे.

तांब्याला एवढी झळाळी का?

तांबे धातूच्या किंमतीत एवढी मोठी वाढ होण्याचं प्रमुख कारण म्हणजे AI डेटा सेंटर्सचा वाढता विस्तार! फ्रीडलँड यांनी सांगितलं की २०२६ च्या शेवटापर्यंत ग्लोबल डेटा सेंटर्सना जपान एवढी उर्जा लागेल. जपान ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. फ्रीडलँड यांनी शिकागोमध्ये मायक्रोसॉफ्टच्या एका बेबी डेटा सेंटरचं उदाहण दिलं. या एका डेटा सेंटरसाठी जवळपास २० लाख किलोग्रॅम तांब्याची पडली गरज होती.

टेस्लाच्या प्रत्येक सर्व्हरसाठी सोनं, लोखंड, गॅलियम, अँटीमनी, टंगस्टन, चांदी सारखे अनेक रेअर अर्थ मिनरल्स इंडियम, टॅटलम, पॅलेडियम, बेरियम नाईओबियम आणि टायटॅनियम या धातूंची गरज होती. त्यांनी जर ग्रीन एनर्जीमधील झपाट्याने होणारे बदल आणि AI डेटा सेंटर्सचे स्वप्न बाजूला ठेवलं तरी तांबे धातूची जगात खूप कमतरता आहे.

तांब्याची मागणी प्रचंड वाढणार

फ्रीडलँड यांनी जर आपण सध्याची लाईफस्टाईल कायम ठेवली किंवा ठेवण्यासाठी आपल्याला पुढच्या १८ वर्षात ७० कोटी मेट्रिक टन तांबे अजून काढावं लागणार आहे. हा आकडा एवढा खूप मोठा आहे. कारण मानुष्यानं गुहेतून बाहेर येऊन पुढच्या १० हजार वर्षात जेवढं तांबे जमिनीतून बाहेर काढलं नाही तेवढं पुढच्या १८ वर्षात आपल्याला लागणार आहे.

फ्रीडलँड यांनी सांगितलं की भविष्यातील ही मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी २०५० पर्यंत प्रत्येक वर्षी सहा नव्या उच्च श्रेणीतील तांब्याच्या खाणी सुरू कराव्या लागतील. या नव्या उत्पादनाचा ४० टक्के भाग हा पूर्णपणे ग्रीड अपग्रेड, इलेक्ट्रिसिटी आणि डेटा सेंटरसाठी वापरला जाईल.

किंमत दुप्पट का होणार?

फ्रीडलँड यांनी १९०० पासून आतापर्यंत तांब्याच्या एका युनिट उत्पादनासाठी लागणारी उर्जा ही १६ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच तांब्याचे एक युनिट तयार करण्यासाठी लागणारी पाण्याची मात्रा देखील दुप्पट झाली आहे. त्यामुळं तांबे निर्मितीसाठी लागणाऱ्या खणन गरजा भागवण्यासाठी तांब्याची किंमत ही दुप्पट होणं गरजेचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT