सध्या सोशल मीडियावर एक मेसेज जोरात व्हायरल होत आहे. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर एटीएममधून पैसे काढण्याआधी ‘Cancel’ बटण दोनदा दाबले, तर आपला एटीएम पिन (PIN) सुरक्षित राहतो आणि कोणताही फ्रॉड होऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर असेही सांगितले जात आहे की, जर एटीएम मशीनमध्ये कुणी छेडछाड केली असेल, तर ही ट्रिक तो सेटअप फेल करेल. या मेसेजमध्ये हा सल्ला RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने दिला असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
सरकारी माहिती संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या ‘फॅक्ट चेक’ विभागाने या व्हायरल मेसेजवर स्पष्टीकरण दिले आहे. PIB ने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे आणि याचा RBI शी काहीही संबंध नाही. अशा कोणत्याही ट्रिकचा एटीएम सुरक्षेशी काही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
ही पहिली वेळ नाही आहे की असा मेसेज व्हायरल झाला आहे. याआधीही 2022 आणि 2023 मध्ये असेच मेसेज फिरले होते, ज्यात 'Cancel' बटण दोनदा दाबण्याची ट्रिक सांगितली गेली होती. तेव्हाही PIB ने हे खोटं असल्याचं सांगितलं होतं.
PIN टाकताना कीपॅड हाताने झाकावा.
नेहमी सुरक्षित आणि चांगल्या प्रकाशात असलेल्या ATM चा वापर करा.
मशीन वापरण्याआधी त्यावर कुठलीही डिव्हाइस लावली आहे का किंवा काही छेडछाड झाली आहे का, याची खात्री करा.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
जर तुमच्याकडे असा कोणताही मेसेज आला जो स्वतःला RBI शी संबंधित सांगतो, तर त्याची खातरजमा करा. तुम्ही PIB कडे +91-8799711259 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर मेसेज पाठवून पडताळणी करू शकता. तसेच pib.gov.in या वेबसाइटवरही फॅक्ट चेकची माहिती मिळते.
PIN टाकताना नेहमी कीपॅड झाकून ठेवा.
बँकेकडून येणारे SMS अलर्ट्स सुरू ठेवा.
बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासा.
कोणतीही अनोळखी ट्रांजॅक्शन दिसल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा.
ATM वापरताना अफवांवर विश्वास न ठेवता योग्य खबरदारी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ‘Cancel’ बटण दोनदा दाबण्याने काही फायदा होत नाही, हे लक्षात ठेवा. योग्य माहिती आणि सावधगिरीच ATM फ्रॉडपासून तुमचं संरक्षण करू शकते.