Stock Market Updates BSE Sensex
सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सपाट पातळीवर आला. file photo
अर्थभान

Stock Market Updates | सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट, 'हे' शेअर्स फोकसमध्ये

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी (दि. १८) घसरणीसह झाली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २७५ अंकानी घसरून ८०,४०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी २४,५०० च्या पातळीवर खुला झाला होता. त्यानंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दोन्ही निर्देशांकांनी सुरुवातीचे नुकसान मागे टाकत तेजीच्या दिशेने चाल केली. सकाळी १० वाजता सेन्सेक्स १०० अंकांच्या वाढीसह ८०,८०० वर पोहोचला. तर निफ्टी २४,६०० वर होता. सुरुवातीला बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये अधिक घसरण झाली. (Stock Market Updates)

सेन्सेक्स आज ८०,५१४ वर खुला झाला. त्यानंतर तो ८०,८०० वर पोहोचला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, मारुती हे शेअर्स घसरले आहेत. तर ॲक्सिस बँक, सन फार्मा, इन्फोसिस या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.

निफ्टीवर बजाज ऑटो, कोल इंडिया, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत. तर LTIMindtree, ओएनजीसी, सन फार्मा हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत.

एशियन पेंट्स शेअर्समध्ये घसरण

एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास ३ टक्क्यांनी घसरण झाली. त्यानंतर बीएसई सेन्सेक्सवर सकाळी १० वाजता हा शेअर्स सुमारे २ टक्के घसरणीसह २,९१७ रुपयांवर होता. ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत एशियन पेंट्सची कमाई अंदाजापेक्षा कमी राहिली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT