सात महानगरांतील परवडणारी घरे गुणवत्ताहीन; सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती File Photo
अर्थभान

Affordable Housing Quality Survey: सात महानगरांतील परवडणारी घरे गुणवत्ताहीन; सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती

घरांच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ

पुढारी वृत्तसेवा

affordable housing poor quality survey

पुणे: परवडणार्‍या घरकांकडे बांधकाम व्यावसायिक तितके गांभीर्याने पाहत नसल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. बांधकामाची गुणवत्ता, घरांची रचना खराब असून, त्याचा आकारही कमी असल्याचे खरेदीदारांचे म्हणणे आहे.

पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरूसह देशातील सात महनगरांमधील 45 लाख रुपयांच्या आत किंमत असलेल्या परवडणार्‍या श्रेणीतील घरांचा वाटा 2020 मध्ये 40 टक्के होता. आता एकूण घरांच्या विक्रीतील परवडणार्‍या घरांचा वाटा 17 टक्क्यांवर आक्रसला आहे. अ‍ॅनारॉक रिसर्चने जानेवारी ते जून 2025 या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात 8 हजार 250 खरेदीदारांशी संवाद साधण्यात आला. (Latest Pune News)

या सर्वेक्षणातील 90 व्यक्तींनी परवडणार्‍या घरांची गुणवत्ता चांगली नसून त्याचे आरेखनही खराब असल्याचे सांगितले आहे. तर, 77 टक्के जणांनी घरे अत्यंत लहान असल्याचे सांगितले आहे. याशिवाय 92 टक्के जणांनी प्रकल्पाचे ठिकाण चांगले नसल्याचे सांगितले असून, सध्या उपलब्ध असलेल्या प्रकल्पांवर 62 टक्के जणांनी निराशा व्यक्त केली आहे.

गत दोन वर्षांत परवडणार्‍या घरांचा टक्का वेगाने घसरला आहे. पुणे, मुंबईसह देशातील सात महानगरांमध्ये 2029 मध्ये सादर झालेल्या नवीन प्रकल्पातील 40 टक्के घरे परवडणार्‍या श्रेणीतील होती. त्यात जानेवारी ते जून 2025 मध्ये 12 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

घरांच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ

गत दोन वर्षांत नवी दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशातील सात महानगरांमधील घरांच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कॅलेंडर वर्ष 2023 च्या दुसर्‍या तिमाहीत (एप्रिल-जून) घरांची सरासरी किंमत 6 हजार 1 रुपये प्रतिचौरस फूट होती. त्यात एप्रिल ते जून 2025 या कालावधीत 8,990 रुपये प्रतिचौरस फुटांपर्यंत वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT