8th Pay Commission Fitment Factor: आठवा वेतन आयोग कोणत्या शिफारसी करतो याकडे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि त्यापेक्षा जास्त संख्येनं असलेल्या पेन्शनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे. आठव्या वेतन आयोगात सर्वात मोठा विषय हा आयोग लागू झाल्यावर पगार किती वाढणार हा आहे. कारण आठव्या वेतन आयोगाकडे केंद्रीय कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर ३.६१ पासून ४.०० पर्यंत ठेवण्याची मागणी केली आहे. सातव्या वेतन आयोगावेळी हा फिटमेंट फॅक्टर २.७५ इतका होता. त्यावेळी किमान बेसिक पे हा ७ हजारावरून १८,००० हजारापर्यंत वाढला होता.
फिटमेंट फॅक्टर हा एक असा गुणक असतो जो सध्याच्या बेसिक पेशी गुणाकार करून नवीन बेसिक बे काढला जातो. याचा परिणाम महागाई भत्त्यावर देखील होतो. महागाई वाढल्यामुळे जी कमाई कमी झालेली असते त्याची भरपाई व्हावी तसेच खरी पगारवाढ मिळावी यासाठी हा फिटमेंट फॅक्टर महत्वाचा असतो.
आठव्या वेतन आयोगाने जर फिटमेंट फॅक्टर ४.० ची मागणी मान्य केली अन् तशी शिफारस त्यांनी केंद्र सरकारला केली तर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा बेसिक पे ७२ हजार रूपये होईल. फिटमेंट फॅक्टर ४ असावा अशी ही प्रमुख मागणी बीपीएमएस अर्थात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने ठेवली आहे.
त्यांच्या मतानुसार हे कॅलक्युलेशन तीन टप्प्यात तयार झाले आहे. पहिले २०१६-१७ ते २०२४-२५ दरम्यान नेट नॅशनल इनकममध्ये ८६.७६ टक्के वाढीचा आधार बनवला होता. त्यानंतर कुटुंबात ५ सदस्यांचा हिशेब करून ८८,५२४ रूपये रक्कम समोर आली होती. मात्र सरकारी तिजोरीवर पडणारा बोजा पाहता ती कमी करून ७२ हजार करण्यात आली.
दुकरीकडे नॅशनल काऊन्सील जेसीएम स्टाफ साईड आणि भारतीय पेंशनर्स समाजने ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जर त्यांची मागणी मान्य झाली तर किमान वेतन हे १८ हजारावरून ६९ हजार रूपये होणार आहे. स्टाफ साईडने ५ सदस्यांचे कुटुंब पकडून ६८,९४७ हा आकडा काढला होता. त्याची राऊंड फिगर करून ६९ हजार बेसिक पे करण्यात यावा अशी मागणी आहे.
स्तर १ : जर फिटमेंट फॅक्टर ३.६१ लागू होतो तर पगार हा ६४ हजार रूपये होणार आहे. तर जर ४.०० फिटमेंट फॅक्टर झाला तर ७२ हजार रूपये बेसिक पे होणार आहे. म्हणजे महिन्याला थेट ७, ०२० रूपयांचा थेट परक पडणार आहे.
स्टाफ साईडने ३.८३ फिटमेंट फॅक्टर पकडून सर्व कॅलक्युलेशन केलं आहे. त्यात स्तर एकचा बेसिक पगार हा ६९ हजार रूपये होईल. तर स्तर ६ चा बेसिक पगार हा १ लाख ३५ हजार ७०० रूपये होणार आहे. लेवल ९ आणि १० चा बेसिक पगार हा २ लाख १५ हजार १०० रूपये होणार आहे. बीपीएमएसने ४ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. त्यात स्तर एकचा बेसिक पगार हा ७२ हजार रूपये होईल. तर लेवल १८ पर्यंत हा १० लाख पर्यंत पोहचेल.