आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक आरोग्य सांभाळणे हे मोठं आव्हान बनलं आहे. सोशल मीडिया, मोबाईलचा अति वापर आणि सततच्या स्क्रीन टाइममुळे मुलं आणि तरुणांमध्ये एकाग्रता कमी होणं, झोपेच्या समस्या, स्मरणशक्ती कमी होणं यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर सहज उपाय आहे
अनुलोम-विलोम प्राणायाम.
योग प्रशिक्षक रामदेवबाबा सांगतात की, रोज फक्त ५ ते १० मिनिट हा प्राणायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. मानसिक तणाव कमी होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला, व्हायरल फिव्हर, श्वसनाचे आजार पटकन होतात. प्राणायाम केल्याने श्वसन संस्थेची ताकद वाढते, फुफ्फुसांची क्षमता सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे पावसाळ्यात अनुलोम-विलोम अधिक फायदेशीर ठरतो.
आजकालच्या मुलांमध्ये मोबाईल, गेम्स आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. शिक्षकांनी शिकवलेलं पटकन विसरतात, परीक्षेत गुण कमी येतात. योग प्रशिक्षक सांगतात की, अनुलोम-विलोम केल्याने मेंदूत ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, न्यूरॉन्सची कार्यक्षमता सुधारते आणि एकाग्रता वाढते.
शांत जागी पद्मासन किंवा वज्रासनात बसा.
उजव्या हाताचा अंगठा वापरून उजवी नाकपुडी बंद करा.
डावीकडून हळूहळू, खोल श्वास घ्या.
अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजवीकडून श्वास सोडा.
पुन्हा उजवीकडून श्वास घेऊन डावीकडून सोडा.
हा एक चक्र झाला. असे ५-१० मिनिटे दररोज करा.
७-१० दिवसांत मन शांत होतं आणि १५-२० दिवसांत स्मरणशक्तीत सुधारणा दिसून येते.
स्मरणशक्ती वाढते – विद्यार्थ्यांसाठी आणि ऑफिसमधील ताण असणाऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी.
तणाव कमी होतो – डिप्रेशन आणि अँक्सायटीसाठी नैसर्गिक उपाय.
श्वसन संस्थेची ताकद वाढते – दम्याचे रुग्ण किंवा सर्दी-खोकला असणाऱ्यांना फायदा.
रक्ताभिसरण सुधारते – शरीराला ऊर्जा मिळते, सुस्ती कमी होते.
नसांच्या समस्या दूर होतात – अंग सुन्न होणे, झिणझिण्या, पक्षाघात यावर फायदा.
मन शांत आणि रिलॅक्स होते – चांगली झोप लागते, चिडचिडेपणा कमी होतो.