आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बहुतेक लोक बाहेरचं खाणं, पॅकेटबंद स्नॅक्स किंवा तळलेले पदार्थ सहज खातात. पण जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने लोकांना स्पष्ट इशारा दिला आहे की काही विशिष्ट फूड्स हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. हे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढणे, ब्लॉकेज निर्माण होणे, हार्ट अटॅकचा धोका वाढणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.
विशेषतः डीप फ्राइड फूड्स पकोडे, समोसे, फ्राइड चिकन, कचोरी, चिप्स यामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. शिवाय हे पदार्थ बनवताना तेल वारंवार गरम केले जाते, ज्यामुळे तेलातील ‘फॅट’ विषारी रूप घेऊन शरीरातील धमन्यांना गंभीर नुकसान पोहोचवते. चला पाहूया, WHO च्या सूचना अनुसार कोणते 7 पदार्थ हृदयासाठी सर्वाधिक धोकादायक आहेत आणि का
1) डीप फ्राइड फूड्स
समोसा, पकोडा, फ्राइड चिकन, फ्रेंच फ्राईज हे सर्व पदार्थ ट्रान्स फॅटने भरलेले असतात. हे फॅट रक्तवाहिन्यांना जाड बनवते व ब्लॉकेजचा धोका वाढवते.
2) प्रोसेस्ड मीट
सॉसेज, हॉट डॉग, बेकन यामध्ये सोडियम, प्रिझर्वेटिव्ह आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असते. हृदयावर याचा अत्यधिक ताण येतो.
3) रिफाइंड कार्बोहायड्रेट
मैदा, पांढरी ब्रेड, बेकरी आयटम्स हे पदार्थ साखर पटकन वाढवतात आणि ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ला गती देतात.
4) जास्त मीठ असलेले पदार्थ
चिप्स, नमकीन, पापड आणि पॅकेट स्नॅक्समध्ये मीठ जास्त असतं. सोडियम वाढल्यास रक्तदाब वाढतो आणि हृदय कमजोर होते.
5) साखरयुक्त पेये
कोल्ड ड्रिंक, सोडा, पॅकेज्ड ज्यूस यात साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीवर असते. हे वजन वाढवते व धमन्यांवर चरबी साठवते.
6) बेकरी वस्तू व पॅस्ट्रिज
कुकीज, केक, बन, पॅस्ट्रिज यामध्ये ट्रान्स फॅट, मैदा आणि साखर तिन्ही जास्त. हे ‘हार्ट हेल्थ’चे तिन्ही शत्रू आहेत.
7) पॅकेज्ड-फास्ट फूड
इंस्टंट नूडल्स, फ्रोजन पिझ्झा, बर्गर यात प्रिझर्वेटिव्ह, फॅट आणि मीठ भरपूर. हृदयावर थेट परिणाम.
ट्रान्स फॅटचे सेवन शून्याच्या जवळ ठेवा.
घरचे ताजे भोजन, फळे-भाज्या, संपूर्ण धान्य यांना प्राधान्य द्या.
डीप फ्राय पदार्थ आठवड्यातून 1 पेक्षा जास्त वेळ टाळा.
जास्त मीठ, जास्त साखर आणि जास्त तेल असलेले पदार्थ शक्य तितके कमी करा.
आजपासूनच जर हे बदल केले, तर हृदयाचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं टिकू शकतं.