आपल्या शरीरातील काही आजारांचे संकेत थेट पायांमध्ये दिसतात. पायांमध्ये सूज, फाटलेली त्वचा, झणझणाट किंवा वारंवार पेटके येणे याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. ही लक्षणे पोषणतत्वांची कमतरता, रक्ताभिसरणातील अडथळा किंवा अंतर्गत अवयवांवर येणारा ताण दर्शवतात.
व्हेरिकोज व्हेन्स (Varicose Veins) म्हणजे पायांमधील रक्तवाहिन्या सुजून मोठ्या, वळवळीत व निळसर दिसायला लागणे. या शिरा सामान्यतः त्वचेच्या थोड्याच आत असतात आणि रक्त हृदयाकडे परत नेण्यासाठी कार्य करतात. पण जेव्हा यामधील झडपा (valves) योग्य प्रकारे काम करत नाहीत, तेव्हा रक्त साचून राहतो आणि शिरा फुगतात, ज्यामुळे त्या स्पष्टपणे दिसायला लागतात.
झडपांची कमजोरी: रक्त परत नेण्यासाठी शिरांमध्ये असलेल्या झडपा योग्यरित्या न केल्यास रक्त साचते.
दीर्घकाळ उभं राहणं: सतत उभं राहणाऱ्या व्यक्तींना हे जास्त प्रमाणात होतं.
वाढलेलं वजन: शरीरावर वाढलेला ताण पायांवरील रक्ताभिसरणावर परिणाम करतो.
गर्भधारणा: हार्मोनल बदल व वाढलेला रक्तदाब यामुळे स्त्रियांमध्ये धोका जास्त.
आनुवंशिकता: आई-वडिलांना किंवा कुटुंबात इतरांना असले तर शक्यता वाढते.
वय: वय वाढल्यास रक्तवाहिन्या कमकुवत होतात.
पायांमधील निळ्या, नागमोडी आणि उभ्या दिसणाऱ्या शिरा
दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर पाय दुखणं किंवा थकवा जाणवणं
पायांमध्ये जळजळ, झणझणाट किंवा खाज
रात्री झोपताना मुंग्या येणे
काही वेळा सूज व त्वचेला खवखव
कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स: यामुळे रक्ताभिसरण सुधारतो आणि सूज कमी होते.
जीवनशैलीतील बदल: नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, आणि पाय उंच ठेवणे उपयोगी.
औषधोपचार: काही प्रकरणांमध्ये डॉक्टर औषधे किंवा मलम सुचवतात.
लेझर किंवा शस्त्रक्रिया: गंभीर अवस्थेत शिरे काढून टाकण्याची किंवा लेझरने बंद करण्याची प्रक्रिया केली जाते.
व्हेरिकोज व्हेन्स सौम्य स्वरूपात असला तरी दुर्लक्ष केल्यास त्वचा खराब होणे, रक्तस्त्राव किंवा अल्सर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणं दिसू लागताच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.