Vitamin C Deficiency
विटामिन C हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं आणि विविध अवयवांचे कार्य सुरळीत ठेवतं. मात्र, जर आहारातून याचा पुरेसा पुरवठा नसेल, तर याची कमतरता अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते.
नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या प्रिव्हेन्टिव हेल्थ विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांच्या मते, विटामिन C च्या दीर्घकाळ कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. यात थकवा, अशक्तपणा, मसूड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर निळसर डाग दिसणे आणि सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात. ही स्थिती कोलेजनच्या कमतरतेमुळे होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आणि ऊती कमजोर होतात.
विटामिन C आयर्नच्या शोषणात मदत करतं, जे रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी आवश्यक असतं. जर शरीरात याची कमतरता असेल, तर शरीर योग्यप्रकारे आयर्न शोषून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो.
विटामिन C ची कमतरता हिरड्या कमजोर करते. यामुळे सूज, रक्तस्राव, दुखणं, आणि गंभीर अवस्थेत दात गळणं किंवा मसूडे सडणं यासारख्या समस्या उद्भवतात. या कारणामुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची शक्यता वाढते.
कोलेजनच्या कमतरतेमुळे शरीरातल्या जखमा सहज भरून येत नाहीत. जखमा उशिरा भरतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
कोलेजन कमजोर झाल्यास सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्यामुळे सूज व वेदना निर्माण होतात. हाडे कमजोर होऊन हाडदुखीची तक्रार सुरू होते.
विटामिन C प्रामुख्याने आंबट फळांमध्ये भरपूर प्रमाणात असते जसे की संत्रं, लिंबू, आवळा, कीवी, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो. रोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करून आपण विटामिन C च्या कमतरतेपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.
विटामिन C फक्त सर्दी-खोकल्याच्या उपचारापुरतंच मर्यादित नाही. त्याचा संबंध आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे याची कमतरता वेळीच ओळखा आणि योग्य आहाराच्या माध्यमातून भरपाई करा.