tips tricks do you set ac at 16 degrees immediately after entering room electricity bill increase follow ac ventilation flush
पुढारी ऑनलाईन :
तुम्हीही उन्हाळ्यात खोलीत शिरताच खिडक्या-दरवाजे बंद करून एसी 16 किंवा 18 डिग्रीवर चालू करता का? असे केल्याने तुमच्या एसीवर जास्त ताण येतो. वीजेचा वापर वाढतो आणि एसीचे आयुष्य कमी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, एसी लगेच चालू करण्यापूर्वी ‘AC Ventilation Flush’ ही पद्धत वापरणे योग्य आहे. या प्रक्रियेत एसी चालू करण्याऐवजी पंखा चालू करून आणि खिडक्या-दरवाजे उघडून खोलीतील गरम हवा बाहेर काढली जाते.
AC Ventilation Flush म्हणजे काय?
एसी देखभाल करणारे इंजिनिअर आणि तज्ज्ञ या पद्धतीची शिफारस करतात. त्यांच्या मते, खोलीत शिरताच लगेच एसी चालू करू नये. आधी 5 मिनिटांसाठी पंखा चालू करून खिडक्या-दरवाजे उघडे ठेवावेत.
यामागचा तर्क असा आहे की बंद खोलीत दिवसभर भिंती आणि फर्निचर उष्णता शोषून घेतात. जर लगेच एसी चालू केला, तर तो आधी या गरम भिंती आणि वस्तू थंड करण्यासाठी जास्त काम करतो, त्यामुळे जास्त वीज खर्च होते.
AC Ventilation Flush करण्याचे टप्पे
खोलीत शिरल्यानंतर सर्वप्रथम खिडक्या-दरवाजे उघडा
पंखा फुल स्पीडवर चालू करा
5 ते 7 मिनिटे तसेच ठेवा, जेणेकरून गरम हवा बाहेर जाईल
आता एसी चालू करा, पण सुरुवातीला 2–3 मिनिटे फॅन मोडवर ठेवा
त्यानंतर तापमान सेट करा, पण ते 16 किंवा 18 डिग्रीवर ठेवू नका
लगेच एसी चालू करण्याचे नुकसान
वीज बिलात 30–40% पर्यंत वाढ होऊ शकते
एसीचा कंप्रेसर पूर्ण क्षमतेने काम करतो
जास्त ताणामुळे कंप्रेसरची आयुष्य कमी होते
भारतासारख्या उष्ण देशात 16 डिग्रीपर्यंत तापमान आणण्यासाठी एसीला जास्त मेहनत घ्यावी लागते, जे नुकसानदायक ठरते
AC चा “मॅजिक नंबर” काय आहे?
अनेक जण विचारतात की एसी कोणत्या तापमानावर चालवावा. तज्ज्ञांच्या मते, एसी 24 ते 26 डिग्री दरम्यान ठेवणे योग्य आहे. त्यासोबत पंखा कमी गतीने चालू ठेवल्यास थंड हवा संपूर्ण खोलीत समान पसरते. यामुळे कंप्रेसरवरील ताण कमी होतो आणि एसीचे आयुष्य वाढते.