राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे. पण, जर तुम्हाला हृदयविकार (Heart Disease), मधुमेह (Diabetes) किंवा उच्च रक्तदाबाचा (High BP) त्रास असेल, तर प्रत्येक राग म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयावर एक छोटा बॉम्ब ठेवत आहात, हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे.
जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा शरीरात 'Sympathetic Overdrive' सुरू होतो, म्हणजेच तणावपूर्ण स्थिती निर्माण होते. शरीरात ॲड्रेनालिन (Adrenaline), नॉरअॅड्रेनालिन आणि कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सचा (तणाव संप्रेरकांचा) पूर येतो. यामुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि रक्तदाब (BP) झपाट्याने वर जातो. त्यामुळे राग आल्यावर तो दाखवणं हाच एकमेव मार्ग नाही, तर तो 'स्मार्टली हाताळणं' हा मार्ग तुमच्या हृदयासह शरीराला देखील वाचवू शकतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांना राग आल्यास कॉर्टिसोल हे हार्मोन इन्सुलिनच्या (Insulin) कामात अडथळा आणते, त्यामुळे रक्तातील साखर (Blood Sugar) अचानक वाढते. ब्लड शुगर कंट्रोल बिघडतो.
उच्च रक्तदाब (High BP) असलेल्यांना अचानक उसळलेला राग स्ट्रोकचा (Stoke) धोका वाढवतो. ज्यांचा बीपी आधीच अनियंत्रित आहे, त्यांच्यासाठी हे तात्पुरते 'Hypertensive Emergency' (अतिउच्च रक्तदाबाची आणीबाणी) ठरू शकते.
हृदयविकार (Heart Disease) रुग्नांना राग आल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या (Coronary Arteries) आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे छातीत दुखणे (Angina) आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
राग ही मानवी भावना असली तरी, ती 'स्मार्टपणे' हाताळणे एक प्रकारचे कौशल्य आहे. असे केल्यास तुम्ही तुमच्या हृदयाला सुरक्षित ठेऊ शकता. तुम्हाला येणारा राग आणि यामुळे होणारी शारिरीक इजापासून वाचायचं असेल तर, घरात बसून तुम्ही हे ५ सोपे उपाय लगेच करू शकता
श्वासोच्छ्वास तंत्र (4-4-4-4 Breathing):
४ सेकंदात श्वास घ्या → ४ सेकंद थांबा → ४ सेकंदात सोडा → ४ सेकंद थांबा. हे चक्र शांतपणे करा. यामुळे 'Vagal Tone' वाढतो आणि हृदयाचे कार्य शांत होते.
५ मिनिटांची चाल (Walking Meditation):
राग आल्यावर ५ मिनिटे शांतपणे चाला. चालताना फक्त तुमच्या श्वासावर आणि पायांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करा.
थोडं-थोडं पाणी प्या:
थंडगार पाणी घशातून हळू हळू पिताना 'Parasympathetic System' (शरीराला शांत करणारी चेतासंस्था) सक्रिय होते, ज्यामुळे राग कमी होण्यास मदत होते.
मधुर गाणी ऐका (Music = Dopamine):
तुमच्या आवडीची शांत (soothing) गाणी ऐका. संगीत ऐकल्याने डोपामाइन (Dopamine) नावाचे आनंदी हार्मोन स्रवते आणि रक्तदाब कमी होतो.
ताबडतोब उत्तर देणं टाळा:
रागात बोललेले ८०% शब्द नंतर पश्चात्ताप करायला लावतात, हे सत्य आहे. राग शांत झाल्यावरच बोला. बोलण्याआधी काही क्षण थांबा.