पुढारी वृत्तसेवा
आपल्या सर्वांनाच आयुष्यात काही नकारात्मक लोक भेटतात, जी आपली ऊर्जा शोषून घेतात, सतत टीका करतात, अशी लोकं नकोशी वाटतात.
कौटुंबिक समारंभ असो किंवा कामाची जागा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशा लोकांशी वारंवार सामना करावा लागतो.
त्यांचे नकारात्मक वर्तन आपल्या भावनिक आरोग्यावर आणि मनःशांतीवर खूप खोलवर परिणाम करू शकते.
तुम्हाला अशा लोकांशी योग्य प्रकारे व्यवहार करता यावा यासाठी, मानसशास्त्रावर आधारित काही टिप्स.
मर्यादा निश्चित करा
लोक तुम्हाला तितकंच वागवतात, जितकं तुम्ही सहन करता. त्यामुळे कोणते वर्तन तुम्हाला मान्य नाही हे स्पष्टपणे सांगणे आणि आपली मर्यादा ठरवणे महत्त्वाचं आहे. जर कुणी ती मर्यादा ओलांडली, तर शांतपणे पण ठामपणे त्यांना थांबवा किंवा त्या परिस्थितीतून बाहेर पडा.
दुर्लक्ष करा आणि गोष्टी वैयक्तिक घेऊ नका
अशा लोकांचे नकारात्मक वर्तन हे त्यांचे स्वतःचे अपूर्ण प्रश्न किंवा असुरक्षिततेचे प्रतिबिंब असते तुमच्या किमतीचे नव्हे. त्यामुळे त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. मानसशास्त्र सांगते की ‘भावनिक अंतर’ ठेवा.
प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत रहा
राग, निराशा किंवा अपराधीपणाच्या प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून प्रतिसाद द्या. शांत राहण्यासाठी दीर्घ श्वास घ्या किंवा दहापर्यंत मोजा. नकारात्मक लोकांना इतरांच्या भावनिक प्रतिक्रिया आवडतात.
अशा लोकांशी संपर्क मर्यादित ठेवा
जर एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलून तुमची ऊर्जा शोषते, तर त्यांच्याशी संपर्क मर्यादित ठेवणे योग्य आहे. मानसशास्त्रात याला emotional distancing म्हणतात, म्हणजे ताण देणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवणे.
नियंत्रणाऐवजी सहानुभूतीवर लक्ष केंद्रित करा
नकारात्मक लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. मानसशास्त्र सांगते त्यांच्याकडे दयाभावाने पाहा. असे वर्तन त्यांच्या आतल्या वेदना, असुरक्षितता किंवा भूतकाळातील जखमांमधून येते. त्यामुळे त्यांच्यावर सहानुभूती ठेवा.