Health Care Tips
बाळांना जपा संसर्गापासून File Photo
आरोग्य

Health Care Tips| बाळांना जपा संसर्गापासून

पुढारी वृत्तसेवा

डॉ. गौरांगी वैद्य

लहान बाळाला जवळ घेणे, कवटाळणे, मांडीवर घेऊन थोपटणे हा सर्व ममत्वाचा, मायेचा भाग असतो. याच मायेपोटी मुलांचा पापा घेतला जातो. लहान बाळ असेल तर त्यालाही त्यातून आनंद मिळतो.

परंतु आई-बाबा वगळता अन्य व्यक्तींनी मुलांचा सतत पापा घेणे, त्याच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अन्य व्यक्तींनी मुलांचा सतत पापा घेतल्यास तोंडावाटे काही संसर्ग बाळापर्यंत पोहोचू शकतात.

जसे की, हॉकचा संसर्ग, या विषाणूमुळे बाळाला कोल्द सोअर होऊ शकतो. एखाद्या सर्दी झालेल्या प्रौढ व्यक्तीने पापी घेतल्यास बाळाला हा त्रास होऊ शकतो. बाळाला ओठांवर किंवा तोंडाभोवती लहान फोड येऊ शकतात आणि ते चेहऱ्याच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकते, एका अहवालानुसार, एकदा या व्हायरसने शरीरामध्ये प्रवेश केला, की हा काही लगेच आपला पिच्छा सोडत नाही.

लहान मुलाचे चुंबन घेतल्यामुळे त्यांच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. लाळेमध्ये असलेल्या स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स बॅक्टेरियामुळे काठाच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. याखेरीज पापा घेतल्याने बाळाला अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

जसे की लिपस्टिकमध्ये ब्लूटेन असते, जे सेलिआक रोग असलेल्या बाळासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कधीही बाळाच्या ओठांवर पापी घेणे टाळावे. नवजात बालकांना सुरुवातीच्या महिन्यांत आजार होण्याची अधिक शक्यता जास्त अस्ते.

कारण त्यांच्या आतड्यांतील जीवाणू यावेळी विकसित होत असतात. त्यामुळे अनेक तज्ज्ञ सांगतात की, बाळाला घेण्यापूर्वी हात आणि तोंड धुवावे. तसेच बाळाचे चुंबन घेतल्यामुळे जंतू जाऊ शकतात, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते हे लक्षात घेता, बाळाजवळ जाताना मास्कचा वापर करावा. आई-वडिलांनीही आपल्याला सर्दी-खोकला झाला असल्यास, बाळाची पापी घेगे टाळावे.

SCROLL FOR NEXT