आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |शुक्रवार, १९ जुलै २०२४

आजचे राशिभविष्य :शुक्रवार, १९ जुलै २०२४
Horoscope Today
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?File Photo

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : आज वैयक्तिक संबंध अधिक दृढ होतील. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. चांगल्या कामात गुंतवणूक केल्याने मन प्रसन्न राहील. शेजाऱ्यांशी असलेले मतभेदही दूर होतील. एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता मनात भीती आणि तणाव निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

वृषभ : सामाजिक संस्थेतील कार्यात सहभागी व्‍हाल

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : आज सामाजिक संस्थेतील कार्यात सहभागी व्‍हाल. यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल. भविष्‍यातील नियोजन करण्‍यासाठी चांगली वेळ आहे. महत्त्वाची कागदपत्रांची हरविणार नाहीत याची काळजी घ्‍या. कोणाशीही वाद घालण्यात वेळ घालवू नका. मन:शांतीसाठी थोडा वेळ ध्‍यान करा. व्यवसायात अनुकूल वातावरण राहिल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.

मिथुन : धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : आज तुमच्या प्रतिभेच्या जोरावर तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. भविष्यातील काही चांगल्या आणि शुभ योजनांवरही खर्च होईल. प्रतिकूल परिस्थितीत संयमाने काम करा. संशयी स्वभावामुळे त्रास होऊ शकतो. मुलांना समस्या सोडवण्यासाठी मदत केल्‍याने त्यांचे मनोबल वाढेल. व्‍यवसायात वाढ होईल.

कर्क : घरातील वातावरण आनंददायी राहील

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकाल. यामुळे तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. घरात जवळच्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक नियोजनामुळे तुम्हाला तुमच्या काही योजना टाळाव्या लागतील. अयोग्य लोकांपासून दूर राहणे चांगले. घरातील वातावरण आनंददायी राहील.

सिंह : इतरांचा सल्‍ला घेणापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चिंता दूर होईल. वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित कराल. जवळच्या व्यक्तीकडून मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते. इतरांचा सल्‍ला घेणापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहिल्याने फायदा होईल.

कन्या : विद्यार्थ्यांनी अभ्‍यासवर लक्ष केंद्रीत करावे

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : आज मालमत्ता खरेदी-विक्रीमध्‍ये यश मिळण्‍याची शक्‍यता. घरात धार्मिक विधी देखील शक्य आहे. विद्यार्थ्यांनी अभ्‍यासवर लक्ष केंद्रीत करावे. मुलांबाबतचे प्रश्‍न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. व्यावसायिक कामांमध्ये अनावश्यक खर्च वाढतील.

तूळ : आज तुम्‍हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : आज तुम्‍हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. ज्येष्ठांचा स्नेह तुमच्यावर राहील. कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करा. कामाच्‍या ताणामुळे चिडचिड होऊ शकते. आर्थिक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा. व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेतला व्‍यावहारिक दृष्‍टीकोन बाळगावा. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित कराल.

वृश्चिक : अप्रिय बातम्यांमुळे नैराश्य येऊ शकते

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : तुमच्या भविष्यातील ध्येयासाठी तुमचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील. सासरच्या मंडळींशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. अप्रिय बातम्यांमुळे नैराश्य येऊ शकते. स्वतःला सकारात्मक कार्यात गुंतवून ठेवा.कठीण परिस्थितीत तुमच्या जोडीदाराची आणि कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल.

धनु : अनावश्यक प्रवास करण्याआधी काळजी घ्या

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : अनावश्यक प्रवास करण्याआधी काळजी घ्या. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला ध्येयापासून दूर जाऊ शकतो. अचानक खर्च झाल्यामुळे नाराज व्हाल. व्यापार क्षेत्राशी संबंधित कोणतीही योजना कामी येईल. पती-पत्नीमध्‍ये सामंजस्याचा अभाव असेल. आरोग्य चांगले राहिल.

मकर : भावंडांशी संबंध दृढ होतील

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : ग्रहमान अनुकूल आहे. वेळेचा सदुपयोग करा. घाईघाईने गोष्टी करण्याऐवजी शांतपणे आणि सकारात्मक मार्गाने गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्‍यास यश मिळेल. कोणत्याही प्रकारची अनिश्चितता असल्यास काम टाळणे चांगले. भावंडांशी संबंध दृढ होतील. वाईट परिस्थितीत आत्मविश्वास आणि मनोबल संतुलित ठेवा. व्यवसायासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करा. आरोग्य चांगले राहिल.

कुंभ : आज सर्जनशील कार्यात चांगला वेळ जाईल

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : आज सर्जनशील कार्यात चांगला वेळ जाईल. घराची देखभालासाठी वेळ व्‍यतित कराल. युवक त्यांच्या करिअरबाबत अधिक जागरूक राहतील. मात्र कोणतेही निर्णय घेण्‍यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. संवाद साधताना योग्य शब्द वापरा. तुमच्यावर बदनामी किंवा खोटे बोलण्याचा आरोप लावला जाऊ शकतो. पती-पत्नींन वाद टाळावेत.

मीन : कार्यात योग्य परिणाम मिळाल्याने मन प्रसन्न राहील

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : कार्यात योग्य परिणाम मिळाल्याने मन प्रसन्न राहील. ग्रहस्थिती तुमच्यासाठी काही चांगल्या संधी निर्माण करत आहेत. उधार दिलेले पैसेही परत मिळू शकतात. नकारात्मक कार्यात गुंतलेल्‍या लोकांना तुमच्या यशाचा हेवा वाटू शकतो. स्वतःला मात झोकून द्या. क्रोध आणि घाई यांसारख्या दुर्गुणांपासून लांब राहा. नोकरीच्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news