शरीरातील कोलेजन वाढवण्यासाठी बोन ब्रॉथ (हाडांचे सूप), आवळा, अक्रोड आणि व्हिटॅमिन सी युक्त फळे जसे की संत्री आणि लिंबू यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय, हलका व्यायाम आणि योगासने केल्याने गुडघे मजबूत होतात. विशेषतः "वज्रासन", "त्रिकोणासन" आणि "ताडासन" यांसारखी योगासने हाडांची मजबुती आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात. रोज ३० मिनिटे चालणे किंवा जिने चढणे यांसारखे हलके व्यायामदेखील या समस्येपासून आराम देऊ शकतात.
आजकाल हृदयविकाराचा झटका (Heart Attack), कार्डिॲक अरेस्ट (Cardiac Arrest) यांसारख्या बातम्या सर्रास ऐकायला मिळतात. पूर्वी हृदयाचे आजार हे केवळ वृद्धापकाळाशी जोडले जायचे, पण आजचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. आज लहान मुलांपासून ते तरुण आणि निरोगी दिसणारे लोकही हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. तुम्हाला कदाचित माहित असेल की, काही विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ हृदयरोगाचा धोका वाढवू शकतात. आपल्या खाण्याच्या सवयी बदलणे कठीण असले तरी, थोडे प्रयत्न केल्यास तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता.
तुम्ही काय खाता हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुम्ही किती खाता हे देखील महत्त्वाचे आहे. गरजेपेक्षा जास्त खाणे, वारंवार खाणे आणि पोट पूर्ण भरेपर्यंत खात राहिल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेता. त्यामुळे सर्वात आधी आपले पोर्शन कंट्रोल (Portion Control) करा. यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास तर मदत होईलच, पण तुमचे वजनही नियंत्रणात राहील.
काय करावे: जेवण्यासाठी लहान प्लेट किंवा वाटीचा वापर करा. कमी कॅलरी आणि जास्त पोषक तत्वे असलेले पदार्थ, जसे की फळे आणि भाज्या, जास्त प्रमाणात खा. जास्त कॅलरी आणि जास्त सोडियम असलेले पदार्थ, जसे की रिफाइंड, प्रोसेस्ड आणि फास्ट फूड, कमीतकमी खा किंवा पूर्णपणे टाळा.
भाज्या आणि फळे ही व्हिटॅमिन्स आणि खनिजांचे उत्तम स्रोत आहेत. यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. भाज्या आणि फळांमध्ये असे अनेक घटक असतात जे हृदयरोगाला प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. यांचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा कमी होण्यासही मदत होते.
संपूर्ण धान्य (Whole Grains) हे फायबर आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत, जे हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओट्स, किनोआ, दलिया, मोड आलेली कडधान्ये (Sprouts) यांसारख्या गोष्टींचा समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन कमी करण्यास मदत होईल.