आपल्या शरीरात तीन दोष मानले जातात वात, पित्त आणि कफ. हे तिन्ही दोष संतुलित असले तर आपण निरोगी राहतो. पण त्यातील एखादा दोष वाढला तर शरीरात आजार निर्माण होतात. डाळींब हे एक साधं पण खूप गुणकारी फळ आहे. पित्त दोष शांत करण्यासाठी ते नैसर्गिक औषधासारखं काम करतं. अॅसिडिटी, छातीतली जळजळ, अपचन, अंगातील उष्णता या सगळ्या तक्रारींवर डाळींब उपयुक्त आहे.
पित्त दोष वाढल्यावर काय होतं?
छातीत जळजळ
वारंवार ढेकर येणे
आंबट उलट्या
अंगात उष्णता जाणवणे
चिडचिडेपणा
त्वचेवर लालसरपणा किंवा पित्त उठणे
अपचन आणि भूक मंदावणे
अशा लक्षणांना आपण पित्त दोष म्हणतो.
डाळींब हे फळ "थंड प्रवृत्तीचे" मानले जाते. म्हणजेच ते शरीराला गारवा देते. त्याची तुरट-गोडसर चव पित्त दोष कमी करण्यास मदत करते.
डाळींब खाल्ल्याने शरीरातील वाढलेली उष्णता कमी होते, आम्लपित्त शांत होते आणि पचनक्रिया सुधारते.
अॅसिडिटी आणि छातीतली जळजळ कमी होते
डाळींबातील नैसर्गिक रस पित्तामुळे तयार होणारी जळजळ शांत करतो.
उष्णता कमी होते
पित्त वाढल्यावर अंगात आग लागल्यासारखं वाटतं. डाळींबाचं थंडसर गुणधर्म उष्णता कमी करतो.
रक्त शुद्धी आणि त्वचेसाठी लाभदायी
डाळींब रक्त शुद्ध करून चेहऱ्यावर तेज आणते. पित्तामुळे होणारे डाग, लालसरपणा कमी होतो.
पचनक्रिया सुधारते
डाळींबात असलेले तंतू (फायबर) पचन नीट होण्यास मदत करतात. अपचन आणि भूक मंदावणे यावर डाळींब फायदेशीर आहे.
थकवा व अशक्तपणा कमी होतो
पित्तामुळे शरीर दमटं, थकल्यासारखं वाटतं. डाळींबातील अँटिऑक्सिडंट्स शरीराला ताकद आणि ऊर्जा देतात.
साधे दाणे खा – रोज सकाळी किंवा दुपारी डाळींबाचे दाणे खाल्ल्याने पित्त कमी होते.
डाळींबाचा रस – रस काढून थोडं मध घालून प्यायला हरकत नाही.
दह्यात मिसळून खा – दाणे दह्यात मिसळून खाल्ल्यास पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.
जास्त पित्त असेल तर – हलक्या फुलक्या आहारात डाळींबाचा समावेश करावा.
ज्यांना सतत थंडी, सर्दी-खोकला त्रास आहे त्यांनी डाळींब कमी प्रमाणात खावं.
मधुमेह असलेल्यांनी रस घेताना साखर अजिबात टाकू नये.
पित्त वाढलेलं असलं तरी, फक्त डाळींबावर अवलंबून राहू नये. डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.