Perfume for Sleep |
दिल्ली : तुम्ही कामावर किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी परफ्यूम लावता. एखाद्या खास व्यक्तीसोबत डेटवर किंवा भेटीला जाताना, विशेष परफ्यूम वापरता. लग्नसमारंभात किंवा नोकरीच्या मुलाखतीला जाताना थोडे फ्रेश वाटावे म्हणूनही तुम्ही त्याचा वापर करता. महत्वाच्या कामाला जाण्यापूर्वी तो तुमचा मूड 'पिक-अप' करतो. आता झोपण्यापूर्वी परफ्यूम लावणे हा देखील एक नवीन ट्रेंड बनला आहे.
विशिष्ट मूडमध्ये विविध प्रकारचे परफ्यूम वापरले जातात. तज्ज्ञांच्या मते, सध्या 'स्लीपिंग सेंट्स' म्हणजेच झोपेसाठीचे खास सुगंध हे फ्रॅग्रन्सच्या जगातला सर्वात नवीन आणि लोकप्रिय ट्रेंड येत आहेत. इन्स्टाग्रामवर लोक त्यांच्या आवडत्या 'बेडटाईम परफ्यूम्स'बद्दल पोस्ट करत आहेत. परफ्यूम लोकांना लहान मुलांसारखी शांत आणि आरामदायक झोप घेण्यास मदत करतात, असे लोक सांगतात.
झोप पूर्ण होत नसल्याच्या समस्येकडे लोक गांभीर्याने पाहू लागले आहेत. अलीकडील अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतीय लोक कमी वेळ झोपतात. ही एक चिंताजनक बाब आहे, कारण झोपेच्या कमतरतेचा संबंध हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि नैराश्य यांसारख्या अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांशी आहे. वाढत्या जागरूकतेमुळे 'स्लीपमॅक्सिंग' (sleepmaxxing) सारखे ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बेडटाईम परफ्यूम हा देखील या 'स्लीप मूव्हमेंट'चा एक भाग आहे.
यामागे शास्त्रशुद्ध कारणेही आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा वास घेता, तेव्हा तुमचा मेंदू त्या वासावर पटकन प्रक्रिया देतो. त्याला भावना किंवा आठवणींशी जोडतो. गंध, भावना आणि आठवणी या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ज्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. म्हणूनच काही विशिष्ट सुगंध आपल्याला अधिक शांत, आनंदी किंवा भूतकाळात घेऊन गेल्यासारखे वाटू शकतात.
वेगवेगळे सुगंध तुमच्या मेंदूवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक आंतरराष्ट्रीय परफ्यूम ब्रँड्स आता न्यूरोसायंटिस्ट्ससोबत काम करत आहेत. मानसिक आरोग्यासाठी आणि शांत झोपेसाठी खास सुगंध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तज्ञ सांगतात की, झोपताना असा सुगंध वापरावा जो फक्त झोपतानाच वापरला जाईल. हे तुमच्या मेंदूला एक संकेत देण्यासारखे आहे की आता झोपायची वेळ झाली आहे. जसे तुम्ही संध्याकाळी दिवे मंद करता जेणेकरून तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाला झोपेची वेळ झाल्याचा संकेत मिळावा. तसे एक विशिष्ट परफ्यूम ही प्रक्रिया करू शकतो.
"काही विशिष्ट सुगंध, विशेषतः सौम्य सुगंध झोपेसाठी मदत करू शकतात. तुमच्या झोपेच्या दिनचर्येत झोपेसाठी अनुकूल परफ्यूमचा समावेश करणे पूर्णपणे ठीक आहे, परंतु त्याचा वापर प्रमाणात करा. जास्त वापरामुळे त्रास होऊ शकतो," असे बंगळूरु येथील ग्लेनिगल्स बीजीएस हॉस्पिटलचे वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉ. मंजुनाथ एमके सांगतात.
"जोपर्यंत कोणाला त्याची अॅलर्जी किंवा संवेदनशीलता नसेल, तोपर्यंत झोपेच्या सुगंधांना रात्रीच्या दिनचर्येत समाविष्ट करणे सुरक्षित आहे. लॅव्हेंडर, चंदन किंवा देवदार यांसारखे सुगंध मज्जासंस्थेला शांत करून आणि चिंता कमी करून झोप सुधारण्यास मदत करू शकतात," असे नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ चेस्ट मेडिसिन सल्लागार डॉ. उज्ज्वल पारख यांनी सांगितले.