Morning Habits For Weight Loss
वजन कमी करायचंय पण वेळ मिळत नाही? मग सकाळी ८ वाजण्यापूर्वीचे 'हे' पाच सोपे उपाय तुमच्या शरीरात मोठा बदल घडवून आणू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात सकाळीच होते.
सकाळी लवकर उठल्याने शरीराचं नैसर्गिक चक्र (बायोलॉजिकल क्लॉक) सुरळीत राहतं. लवकर उठून थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवा, कारण त्यातून मिळणारा व्हिटॅमिन D तुमचं मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत करतो.
उठल्यावर लगेच कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. हवे असल्यास त्यात लिंबू किंवा मध टाकून डिटॉक्स वॉटर तयार करू शकता.
सकाळी ३० ते ४५ मिनिटं योगासनं किंवा थोडी कसरत करा. सूर्यनमस्कार, प्राणायाम हे शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर आहेत. यामुळे मेटाबॉलिझम वाढतं आणि मानसिक तणाव कमी होतो.
सकाळी ८ वाजण्यापूर्वी प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असलेला पौष्टिक नाश्ता करा. उदा. अंडी, ओट्स, फळं, ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असलेला नाश्ता दिवसभरासाठी ऊर्जा देतो.
उठल्या-उठल्या मोबाईलकडे हात नेण्याऐवजी थोडा वेळ पुस्तक वाचण्यासाठी द्या. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि दिवसभर लक्ष केंद्रित राहण्यास मदत होते.