पावसाळा म्हणजे थंड हवामान, सततचा ओलसरपणा आणि हवेतील आर्द्रतेमुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ होणे स्वाभाविकच. या काळात अनेकांना केस गळणे, कोरडेपणा, फ्रिजी केस आणि कोंड्याची समस्या जाणवते. अशा वेळी बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय जास्त फायदेशीर ठरतात.
पावसाळ्यात केसांची काळजी घेणं का आवश्यक आहे?
पावसाळा हा हवामानातील बदलाचा काळ असतो. या ऋतूमध्ये वातावरणात आर्द्रता (ओलसरपणा) खूप वाढतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो. यामुळे केस अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊ लागतात. खाली या काळात केसांची काळजी घेणं का आवश्यक आहे, याची कारणं दिली आहेत.
घरच्या घरी उपलब्ध पदार्थांपासून बनवलेले हेअर मास्क हे स्कॅल्पला पोषण देतात, केसांना हायड्रेट करतात आणि नैसर्गिकरित्या केसांचे आरोग्य सुधारतात. हे मास्क नियमित वापरल्यास केस मऊ, गुळगुळीत आणि चमकदार होतात.
घटक: २ चमचे दही + १ चमचा लिंबाचा रस
फायदा: लॅक्टिक अॅसिडमुळे स्कॅल्प स्वच्छ होतो, कोंडा कमी होतो आणि केस मऊ होतात. लिंबामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्कॅल्प इन्फेक्शन टाळतात.
वापर: पेस्ट तयार करून ३० मिनिटे केसांना लावा, नंतर सौम्य शाम्पूने धुवा.
घटक: १ अंड्याचा पांढरा भाग + १ चमचा मध
फायदा: अंड्यातील प्रथिने केसांची मुळे बळकट करतात, केस गळणे थांबते. मध केसांना नैसर्गिक आर्द्रता पुरवते.
वापर: मिश्रण केसांवर लावून ३० मिनिटांनी धुवा.
घटक: १ पिकलेली केळी + १ चमचा मध
फायदा: केळीमधील नैसर्गिक तेलं आणि अँटीऑक्सिडंट्स केसांना पोषण देतात. मध केसांना गुळगुळीत ठेवते.
वापर: पेस्ट बनवून केसांवर लावा, ३० मिनिटांनंतर धुवा.
आर्द्रतेमुळे केस कुरळे व फ्रिजी होतात
– वातावरणातील आर्द्रता केसांतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे केस कोरडे आणि कुरळे होतात.
केस गळण्याचं प्रमाण वाढतं
– पावसात भिजलेले केस योग्य प्रकारे सुकवले नाहीत तर स्कॅल्पवर बॅक्टेरिया व फंगल इन्फेक्शन होतो, ज्यामुळे केस गळू लागतात.
कोंड्याची समस्या वाढते
– ओलसर स्कॅल्प आणि स्वच्छ न राहिल्यास डँड्रफ (कोंडा) वाढतो, ज्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो.
स्कॅल्प इन्फेक्शनचा धोका वाढतो
– पावसाचे पाणी अनेकदा दूषित असते. हे केसांवर साचल्यास स्कॅल्पवर जळजळ, खाज येणे आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
केस निस्तेज व बिनजीव वाटू लागतात
– सततची दमट हवा आणि केसांना पुरेशी आर्द्रता न मिळाल्याने केसांचा नैसर्गिक तेज हरवतो.
केस गुंतण्याची समस्या
– दमट हवामानामुळे केस पटकन गुंततात, ज्यामुळे केस तुटण्याचा धोका वाढतो.
बाहेरच्या प्रदूषणाचा परिणाम अधिक होतो
– पावसात हवेतील घाण आणि पाण्यातील रसायने केसांवर जमा होऊन त्यांच्या मुळांना हानी पोहोचवतात.