Monsoon Care Tips  Canva
आरोग्य

Monsoon Care Tips : पावसाळ्यात वाढतो फंगल इंफेक्शनचा धोका, जाणून घ्या कारण

Monsoon Skin Problems | हे 5 उपाय करा आणि समस्येपासून दूर राहा

shreya kulkarni

Monsoon Skin Problems

पावसाळा म्हणजे हवामानात बदल, दमटपणा आणि ओलसर वातावरणअशा काळात शरीरातील स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक ठरते. विशेषतः पायांची काळजी घेतली नाही, तर फंगल इंफेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. पावसाळ्यात पाय ओले होणे, दलदलीत अडकणे, चप्पलमधून पाणी आत घुसणे ही समस्या अगदी सामान्य असते. पण यामधून फंगल इंफेक्शनचा धोका उद्भवतो.

ओलसरपणा, बॅक्टेरिया आणि गरम हवामान यांच्या संगतीने पायाच्या बोटांमध्ये किंवा टाचा-तळव्यांवर इंफेक्शन वाढते. त्याला अ‍ॅथलीट्स फूट, रिंगवर्म किंवा टोनेल फंगस असेही म्हणतात.

पायाला खाज येणे, त्वचा सोलटणे, खराब वास येणे, लाल आणि पुरळ उठणे ही या समस्येची मुख्य लक्षणे आहेत. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. मात्र काही सोपे उपाय पाळून आपण ही समस्या टाळू शकतो.

फंगल इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी हे 5 सोपे उपाय

1. पाय नेहमी कोरडे ठेवा

पावसात बाहेरून आल्यावर पाय नीट धुऊन टॉवेलने कोरडे करावेत. विशेषतः बोटांमधील जागा सुकवणे खूप गरजेचे आहे. ओलसरपणामुळे बुरशी वाढते आणि संसर्ग वाढतो.

2. पावसाळी चप्पल किंवा सॅंडल वापरा

पायांमध्ये हवा खेळती राहावी म्हणून ओपन सॅंडल किंवा चप्पल वापरणे योग्य. बंद बूट किंवा शूजमुळे ओलसरपणा कायम राहतो, जो फंगल इन्फेक्शनसाठी पोषक ठरतो.

3. एंटिफंगल पावडरचा वापर करा

बाहेर पडण्यापूर्वी आणि रात्री झोपताना पायावर एंटिफंगल पावडर किंवा स्प्रे वापरल्यास फंगसचा धोका कमी होतो.

4. ओले मोजे किंवा चप्पलाचा वापर टाळा

पाय ओले झाल्यानंतर तेवढेच मोजे पुन्हा वापरणे टाळा. ओले मोजे फंगल इंफेक्शनचे मुख्य कारण ठरतात. स्वच्छ, कोरडे आणि कॉटनचे मोजे वापरा.

5. पायांची स्वच्छता राखा आणि वेळोवेळी स्क्रब करा

दर आठवड्याला एकदा पायांना स्क्रब किंवा क्लीनिंग करणे आवश्यक आहे. टाचा, नखांखालची घाण काढल्याने संक्रमणाचा धोका कमी होतो.

फंगल इंफेक्शन झाल्यास काय करावे?

जर फंगल इंफेक्शनची लक्षणे दिसू लागली (खाज, लालसरपणा, वास, पुरळ), तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणताही क्रीम किंवा घरगुती उपाय स्वतः वापरणे टाळा, कारण चुकीचा उपचार संसर्ग वाढवू शकतो.

पावसाळ्यात पायांची योग्य काळजी घेणे ही गरज आहे, फक्त शोभेसाठी नाही तर आरोग्यासाठी. स्वच्छता, कोरडेपणा आणि योग्य चप्पलाचा वापर करून आपण फंगल इंफेक्शनपासून स्वतःचे रक्षण करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT