आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळच काढू शकत नाहीत. चुकीचा आहार आणि अनियमित दिनचर्या यामुळे वजन वाढणे एक सामान्य समस्या झाली आहे. पण हे वाढते वजन नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी अनेकजण कीटो डाएट, व्हेगन डाएट, इंटरमिटंट फास्टिंग अशा विविध प्रकारच्या डाएट पद्धती अवलंबतात.
अशाच एका लोकप्रिय डाएट प्रकारामध्ये "लो कॅलोरी डाएट"चा समावेश होतो. वजन कमी करण्यासाठी कॅलोरी बर्न करणे किंवा कॅलोरीचे सेवन कमी करणे गरजेचे असते. म्हणूनच काही लोक त्यांच्या जेवणात लो कॅलोरी फूड्सचा समावेश करतात. मात्र, शरीराच्या गरजेनुसार कॅलोरी घेणेही तितकेच आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेऊया
शरीरातील साठलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाते, ज्यामुळे हळूहळू वजन कमी होऊ लागते.
वजन नियंत्रणात राहते
ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो
हृदयविकाराचा धोका कमी होतो
शरीरात सतत उर्जा राहते, सक्रियता वाढते
ही डाएट पद्धत तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अवलंबल्यास शरीराला अनेक दुष्परिणाम होऊ शकतात:
कमजोरी, थकवा, चिडचिडेपणा
शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता
मेटाबॉलिज्म मंदावणे
गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी ही डाएट कधीही स्वेच्छेने घेऊ नये
ही डाएट सुरू करण्यापूर्वी शरीराची खरी गरज काय आहे हे समजून घ्या
आपल्या आहारात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश असावा
केवळ वजन कमी करण्याच्या नादात आरोग्याशी तडजोड करू नका
कोणतीही डाएट पद्धत तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच घ्या, जेणेकरून ती तुमच्या जीवनशैलीशी सुसंगत असेल