वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर अनेक लोक लिंबूपाणी पितात. मात्र, हे पाणी किती आणि कसे प्यायचे, याची योग्य माहिती नसेल तर याचे दुष्परिणाम तुमच्या पचनतंत्रावर आणि दातांवर होऊ शकतात.
लिंबूपाणी म्हणजे फक्त वजन कमी करण्याचे साधन नाही, तर हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणे, त्वचेला उजळपणा देणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही मदत करतं. पण याच लिंबूपाण्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.
विटॅमिन C चा चांगला स्रोत
पचन सुधारते
वजन कमी करण्यास मदत
त्वचेला चमक देतो
इम्युनिटी वाढवतो
रोज जास्त प्रमाणात प्यायल्यास एसिडिटी, अपचन, मळमळ, उलट्या होऊ शकतात
दातांचे इनॅमल कमजोर होते, सेंसिटिव्हिटी वाढते
काही वेळेस अन्ननलिकेत जळजळ होते.
कोमट पाण्याचा वापरून बनवल्यास ते अधिक गुणकारी होते.
गॅस किंवा अॅसिडिटी असेल तर उपाशी पोटी टाळा, नाश्त्यानंतर घ्या.
एकदाच दिवसभरात पुरेसे, वारंवार प्यायल्यास शरीरात अम्लता वाढते.
दातांवरील आम्लाचा परिणाम टाळण्यासाठी पिण्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुवा
हनी किंवा काळं मीठ घातल्यास स्वाद आणि गुणधर्म वाढतात.
वजन कमी करणे हे केवळ एका पेयाने शक्य नसते. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य झोप हवीच. लिंबूपाणी हा फक्त एक पूरक उपाय आहे.