आपल्या तोंडात कोट्यवधी जीवाणू वास करतात, जे केवळ पचनातच नव्हे, तर एकूण आरोग्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आता टोकियो विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने तोंडात आढळणाऱ्या या जीवाणूंमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विलक्षण मोठा आनुवंशिक घटक शोधला आहे. 'इनोक्लेस' असे नामकरण केलेले हे 'डीएनएचे विशाल कडे' आपल्या मौखिक आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे, या घटकामुळे भविष्यात काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
'इनोक्लेस' हे न्यूक्लिक ऍसिडच्या कड्यांचे एक उदाहरण आहे. हे एका मोठ्या प्रकारच्या प्लासमिडचा भाग आहे.
प्लासमिडची संकल्पना: सूक्ष्मजीवांमध्ये मुख्य 'डीएनए' सूचना पुस्तिकेच्या बाहेर आढळणारे हे आनुवंशिक घटक आहेत.
अतिरिक्त जगण्याची किट: टोकियो विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ युया किगुची यांच्या मते, 'इनोक्लेस' हे स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जीवाणूंना तोंडातील जैविक वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे जीवाणूंसाठी 'अतिरिक्त जगण्याची किट' असल्यासारखे काम करतात.
तोंडात आढळणाऱ्या जीवाणूंमध्ये असलेले डीएनएचे विशाल कडे (Giant loops of DNA) आपल्या मौखिक आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे, यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी होण्याची शक्यता आहे. 'इनोक्लेस' असे नामकरण केलेले, नुकतेच शोधलेले हे न्यूक्लिक अॅसिडचे कडे एका मोठ्या प्रकारच्या प्लासमिडचे उदाहरण आहे. मायक्रोब्समध्ये (सूक्ष्मजीव) मुख्य 'डीएनए' सूचना पुस्तिकेच्या बाहेर आढळणारे हे आनुवंशिक घटक आहेत.
टोकियो विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने सांगितले की, 'इनोक्लेस' हे स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जीवाणूंना तोंडातील जैविक वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे जीवाणूंसाठी 'अतिरिक्त जगण्याची किट' असल्यासारखे आहेत. टोकियो विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ युया किगुची म्हणतात, 'तोंडी मायक्रोबायोममध्ये अनेक प्रकारचे जीवाणू आहेत, परंतु त्यांची अनेक कार्ये आणि ती पार पाडण्याचे मार्ग अजूनही अज्ञात आहेत.
हा शोध घेताना, आम्हाला 'इनोक्लेस' आढळले, जे एक्स्ट्राक्रोमोसोमल डीएनएचे एक उदाहरण आहे, हे डीएनएचे भाग पेशींमध्ये (या प्रकरणात शोध जीवाणूंमध्ये) त्यांच्या मुख्य डीएनएच्या बाहेर अस्तित्वात असतात. हा विशाल 'डीएनए' कडा ५६ स्वयंसेवकांच्या लाळेच्या नमुन्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून शोधला गेला. त्यानंतर सामान्य लोकसंख्येमध्ये 'इनोक्लेस'ची उपस्थिती निश्चित करण्यासाठी ४७६ अतिरिक्त नमुन्यांवर चाचण्या घेण्यात आल्या.
या आकडेवारीनुसार, आपल्यापैकी सुमारे तीन-चतुर्थांश लोक हे घटक बाळगून असू शकतात. विशेष म्हणजे, 'इनोक्लेस' चा यापूर्वी शोध लागला नव्हता, याचे एक कारण त्याचा विलक्षण मोठा आकार असू शकते. डीएनए सिक्वेन्सिंगच्या पारंपरिक तंत्रांमध्ये डीएनएचे लहान तुकडे केले जातात. हे तुकडे वाचणे सोपे असले तरी, मोठे क्रम पुन्हा जोडणे कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी, संशोधकांनी 'प्री-न्यूक' नावाची एक खास सिक्वेन्सिग प्रणाली विकसित केली. या प्रणालीने नमुन्याऑतील मानवी डीएनए वेगळा केला, ज्यामुळे तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवाणूंच्या डीएनए जिगसॉ पीसची संख्या कमी झाली आणि 'इनोक्लेस'चा शोध घेणे शक्य झाले.