Creamy Lassi : साखर न वापरता कशी बनवायची मलाईदार लस्सी?  file photo
आरोग्य

Creamy Lassi : साखर न वापरता कशी बनवायची मलाईदार लस्सी?

चव इतकी जबरदस्त की लगेच नोट करून ठेवा रेसिपी

पुढारी वृत्तसेवा

how to make creamy lassi without sugar note down delicious recipe

पुढारी ऑनलाईन :

सध्या मार्चमध्येच मे महिन्यासाख्या उन्हाच्या झळा आणि उष्मा जाणवू लागला आहे. या दिवसात थंड पेये आणि तरल पदार्थ खाण्यावरच जास्त भर दिला जातो. त्‍यात लस्सी म्हटले तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अशावेळी साखर न वापरता लस्सी बनवायची कशी ते जाणून घ्या...

साखरविरहित मलाईदार लस्सी : उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार लस्सी पिण्याचा आनंदच वेगळा असतो. आज आम्ही तुम्हाला साखर न वापरता चविष्ट लस्सी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहोत.

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला लस्सी आवडत असेल पण साखर न वापरता लस्सी बनवायची असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. या लस्सीची चव तर अप्रतिम लागेलच, शिवाय ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. चला तर मग स्टेप बाय स्टेप साखरविरहित मलाईदार लस्सी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

पहिली स्टेप :

लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम घट्ट दही घ्या. तुम्ही घरच्या घरीही दही लावू शकता.

दुसरी स्टेप :

यानंतर थोडीशी बडीशेप (सौंफ) आणि गूळ घ्या. तसेच काही पुदिन्याची पाने धुवून ठेवा.

तिसरी स्टेप :

आता थोडंसं आलं घालून या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका.

चौथी स्टेप :

मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घाला आणि मिक्सर सुरू करा.

पाचवी स्टेप :

लस्सीची चव अजून वाढवायची असेल, तर थोडीशी तुळशीची पानंही घालू शकता.

सहावी स्टेप :

तयार झालेली लस्सी काचेच्या ग्लासमध्ये काढा. शेवटी काही बर्फाचे तुकडे घाला, त्यामुळे लस्सी छान थंड होईल.

इच्छा असल्यास गार्निशिंगसाठी लस्सीवर बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकू शकता. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने ही लस्सी आहारात समाविष्ट केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. साखर न घातलेली ही मलाईदार लस्सी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. या चविष्ट लस्सीत असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT