Identify Fake Watermelon  Canva
आरोग्य

Identify Fake Watermelon | सावधान! बाजारात मोठ्याप्रमाणात विकले जात आहेत ‘केमिकलयुक्त’ कलिंगड

Toxic Watermelon | ‘केमिकलयुक्त’ कलिंगड ओळखण्यासाठी वापरा ‘हे’ सोपे उपाय

shreya kulkarni

toxic watermelon identification health risks summer safety

उन्हाळा सुरू झाल्याने बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगड विक्रीसाठी येऊ लागले आहेत. डॉक्टरही उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यासाठी तरबूज खाण्याचा सल्ला देतात. परंतु, सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक कलिंगडमध्ये कृत्रिम रंग किंवा केमिकल मिसळले जात आहे, जे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते.

तरबूज खाण्याचे फायदे:

कलिंगड थंड प्रवृत्तीचे फळ आहे. त्यात नैसर्गिक ग्लुकोज, पाणी, मिनरल्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होते.

पण, आता धोका वाढलाय!

सध्या बाजारात विकले जाणारे काही कलिंगड केमिकल वापरून रंगवलेले असतात. अशा कलिंगडचे सेवन केल्याने मूत्रविकार, यकृताचे कार्य बिघडणे, पचनतंत्रावर परिणाम आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

केमिकलयुक्त तरबूज ओळखण्याचे 5 सोपे उपाय:

  1. कलिंगड कापल्यावर रंग गडद लाल दिसतो का?
    – अतिनैसर्गिक, जास्तच लालसर रंग दिसल्यास सावध राहा.

  2. कलिंगडच्या गरावर रुईचा कपडा घासून पाहा
    – जर कपड्यावर लाल डाग पडले, तर तो तरबूज केमिकलयुक्त आहे.

  3. पाण्यात कलिंगडचा तुकडा टाका
    – जर पाण्याचा रंग बदलला (लालसर झाला), तर तो नकली आहे.

  4. स्वादात गोडवा कमी वाटतो का?
    – नैसर्गिक गोडवा नसल्यास, केमिकलद्वारे पिकवलेले कलिंगड असू शकते.

  5. कृत्रिम चमक आणि लवकर खराब होणे
    – नैसर्गिक कलिंगड लवकर खराब होत नाही. कृत्रिम रंगवलेले लवकर सडतात.

काय धोका होऊ शकतो?

  • पचनदोष

  • यकृत (लिव्हर) विकार

  • मूत्रमार्गाशी संबंधित समस्या

  • त्वचा व एलर्जी समस्या

  • मानसिक अस्वस्थता

उपाय काय?

  • कलिंगड विकत घेताना ओळखीच्या विक्रेत्याकडूनच घ्या

  • शक्य असल्यास स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करा

  • घरी आणल्यानंतर वरील सर्व टेस्ट करूनच खा

उन्हाळ्यात कलिंगड अत्यंत फायदेशीर फळ आहे, पण बाजारातील केमिकलयुक्त कलिंगड तुमचं आरोग्य धोक्यात घालू शकतात. कलिंगड खाण्याआधी योग्य आहे का याची कात्री करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT