उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा एक गंभीर आजार आहे. या स्थितीत रक्तवाहिन्यांवर असलेला दाब कायम जास्त असतो. वेळेवर नियंत्रण न मिळाल्यास, यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूत रक्तस्राव (स्ट्रोक) होण्याची शक्यता असते. औषधांबरोबरच काही घरगुती उपायांनीही रक्तदाब नियंत्रित करता येतो. चला, जाणून घेऊया असे ८ नैसर्गिक उपाय जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
कीवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C भरपूर असतात. दररोज दोन कीवी खाल्ल्यास सात आठवड्यांत सिस्टोलिक रक्तदाब २.७ mm Hg नी घटल्याचे अभ्यासात दिसले आहे.
कलिंगडात ‘सिट्रुलिन’ नावाचे अमिनो अॅसिड असते, जे शरीरात ‘आर्जिनीन’मध्ये रूपांतरित होते. हे रक्तवाहिन्या शिथिल करून रक्तप्रवाह सुधारते. कलिंगडाचा रस किंवा फोडी दररोज घेणे उपयुक्त ठरते.
पालक, मेथी, चाकवत यांसारख्या पालेभाज्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिज असतात जे सोडियमचे प्रमाण संतुलित करून रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
बीटमध्ये भरपूर नायट्रेट्स असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलतात आणि रक्तवाहिन्या सैल करतात. बीटचा रस किंवा कच्चे बीट किसून खाणे फायदेशीर आहे.
संत्रे, मोसंबी, लिंबू यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. दररोज चार संत्र्यांइतकी सिट्रस फळे खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. मात्र, ब्लड प्रेशरचे औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
बदाम, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स, पंपकिन सीड्स यामध्ये फायबर आणि ‘आर्जिनीन’ असतो. दररोज मूठभर कोरडी, न मीठ घातलेली सुकामेवा खाल्ल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
सॅल्मन, मॅकरेलसारखे फॅटी फिश्स ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सनी समृद्ध असतात. हे शरीरातील सूज कमी करून रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. शाकाहारींसाठी चिया सीड्स, अलसी आणि अक्रोड हे उत्तम पर्याय आहेत.
दररोज सकाळी चालणे, योगासनं किंवा प्राणायाम केल्याने शरीर आणि मन शांत राहते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हे उपाय नियमित करणे फार आवश्यक आहे.