Coconut Water : शहाळ्यातून थेट पाणी पितांय.. मग वाचा, ठरू शकते धोकादायक file photo
आरोग्य

Coconut Water : शहाळ्यातून थेट पाणी पितांय.. मग वाचा, ठरू शकते धोकादायक

उन्हाळ्यात शहाळ्याच्या पाण्याला मागणी वाढते. मात्र शहाळ्यातील पाणी पिताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

पुढारी वृत्तसेवा

Health news experts warn not to directly drink water from coconut here why

पुढारी ऑनलाईन :

आता उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या दिवसात शरीराला नैसर्गिक गारवा मिळण्यासाठी अनेकजण शहाळ्यातील ताजे-मधूर आणि थंड पाणी पिण्याला प्राधाण्य देतात. शहाळ्याचे पाणी शरीरासाठी उत्तम आहे पण काळजी न घेता हे पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते

नारळपाणी पचन सुधारण्यास मदत करते, लघवीचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच ते शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते. पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट्स, अमिनो अ‍ॅसिड्स आणि साइटोकिनिन्ससारख्या खनिजे व इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले नारळपाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

मात्र नारळाच्या आतमध्ये सहजपणे बुरशी (फंगस) तयार होऊ शकते. बुरशी ही सेंद्रिय पदार्थांवर वाढणारी सूक्ष्म जीव आहे, जी ओलसर किंवा दमट वातावरणात पृष्ठभागावर केसांसारखी किंवा चिकट स्वरूपात दिसू शकते. यामुळे नारळ खराब होतो आणि त्याची चव व पोत बदलते.

काही खाद्यपदार्थांमध्ये काही प्रकारची बुरशी सुरक्षित असते, परंतु अनेक वेळा ती गंभीर अॅलर्जी, श्वास घेण्यास त्रास आणि कधी-कधी मायकोटॉक्सिन्समुळे जीवघेणे परिणाम देखील करू शकते. त्यामुळे नारळपाणी पिण्यापूर्वी ते सुरक्षित आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बऱ्याचवेळा नारळ फोडल्यानंर आतील खोबरे हे खराब झाल्याचे दिसून येते. तसेच पाण्यालाही कुबट वास येत आल्याचे आपण पाहिले असेल. मात्र शहाळ्याबाबतीतही असे काही होउ शकते का याची तपासणी करूनच ते पाणी पिणे आवश्यक आहे.

बऱ्याचवेळा विक्रेत्‍यांकडून शहाळे स्ट्रॉ टाकण्यापुरतेच उघडले जाते. त्‍यात स्ट्रॉ टाकून पाणी पिण्याला प्राधाण्य दिले जाते. तर काही ठिकाणी शहाळ्यातील पाणी ग्लासमध्ये काढून ते पॅक करून दिले जाते. बाहेर काढलेले पाणी दिसते. मात्र थेट शहाळ्यातील पाणी पिताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

वाचकांच्या फक्त माहितीसाठी वरील गोष्टी दिल्या आहेत. यात कोणताही दावा करण्यात आलेला नाही. त्‍यामुळे आपण स्व:तहा तपासूनच कोणतीही कृती करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT