5P Diet Principles  Canva
आरोग्य

5P Diet Principles | लठ्ठपणा कमी करायचा आहे?तर मग जाणून घ्या काय आहे '5 पी' सूत्र?

5P Diet Principles | फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे.

shreya kulkarni

5P Diet Principles

फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. यावर उपाय म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने आहारातील '5 पी' (5P) या अभिनव तत्त्वांची शिफारस केली आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे लोकांना संतुलित, सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवणे.

काय आहेत '5 पी'?

FSSAI च्या मते, '5 पी' हे आरोग्यसंपन्न आयुष्याच्या दिशेने पावले टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. हे तत्त्व खालीलप्रमाणे आहेत:

Plenty of Fruits, Vegetables and Water (फळे, भाज्या आणि पाणी मुबलक प्रमाणात):

दररोज आहारात ताजे फळे, हिरव्या भाज्या आणि भरपूर पाणी घेणे शरीरासाठी आवश्यक पोषकतत्त्व पुरवते आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीर हायड्रेट राहते व आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

Pick Healthy Fat (सुदृढ फॅट्सचा समावेश):

आरोग्यदायी वसा, जसे की ऑलिव्ह तेल, बदाम, अक्रोड, फ्लॅक्स सीड्स यांचा वापर करावा. हे हृदयासाठी फायदेशीर असून कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळवतात.

Power Your Plate with Balanced Nutrition (संतुलित पोषणाचा आहार):

प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि चरबी यांचे योग्य प्रमाण असलेला आहार मांसपेशींना बळकट करतो, ऊर्जा पुरवतो आणि शरीरक्रिया सुरळीत ठेवतो.

Plan Meal Time Mindfully (भोजन वेळेचे नियोजन):

ठरावीक वेळेवर जेवण करणे आणि दोन जेवणांमध्ये कमीत कमी ४ तासांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. वारंवार खाण्याची सवय टाळा आणि अन्न नीट चावून खा.

Pay Attention to Portions and Food Choices (अन्नाची मात्रा आणि निवडीकडे लक्ष द्या):

जंक फूड टाळा, योग्य प्रमाणात पौष्टिक अन्न खा. अति खाणे टाळल्यास पचनक्रिया सुधारते आणि वजन वाढण्याची शक्यता कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT