FOFO Fear of Finding Out: आरोग्य तपासण्या, स्क्रिनिंग टेस्ट, ब्लड टेस्ट, मॅमोग्राफी, त्वचेची तपासणी… या सर्व गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण तरीही अनेक लोक या चाचण्या टाळतात. यामागे कारण असू शकतं FOFO- Fear of Finding Out, म्हणजेच काहीतरी वाईट निदान होईल या भीतीने चाचणीच करायची नाही.
FOMO (Fear of Missing Out) हे सगळ्यांना माहित आहे, पण FOFO हा तुलनेने नवा शब्द आहे. डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञ सांगतात की ही समस्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे.
तज्ञ सांगतात की FOFO बहुतेकवेळा भीती, चिंता किंवा पूर्वीचे वाईट अनुभव यांमधून येते. अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेतील मनोवैज्ञानिक लिन बुफ्का सांगतात की, “लोक काही वाईट गोष्टी कळतील म्हणून तपासणीच करत नाहीत, यालाच FOFO म्हणतात”
तज्ञांच्या मते FOFO विशेषत: खालील लोकांमध्ये आढळतो:
जास्त चिंता करत असलेले लोक
OCD किंवा हेल्थ अॅन्झायटी असलेले लोक
डॉक्टरांच्या भेटीची भीती (iatrophobia) असलेले लोक
आधी चाचणीचा वाईट अनुभव आलेले लोक
काही लोक STD, कॅन्सर किंवा इतर गंभीर आजार कळेल या भीतीने टेस्ट करत नाहीत.
2025 च्या सर्व्हेमध्ये 60% लोक आरोग्य तपासण्या टाळतात. फक्त 51% लोकांनी मागील वर्षी नियमित चेकअप करून घेतले आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेत 10% कमी आहे. परिणामी, अनेकांना उशिरा आजाराचे निदान होत आहे, जे अधिक धोकादायक ठरू शकते.
वाईट बातमी ऐकण्याची भीती
लाज वाटेल
डॉक्टर किंवा हॉस्पिटलची भीती
दीर्घकाळ रिपोर्टची वाट पाहण्याची चिंता
उपचार घ्यावे लागतील याचा ताण
कुटुंब किंवा समाज काय म्हणेल याची चिंता
तपासणी करून घेतल्याचे फायदे:
आजार लवकर कळतो
उत्तम उपचार मिळतात
जीव वाचण्याची शक्यता वाढते
टाळण्याचे तोटे:
परिस्थिती गंभीर झाल्यावरच कळते
उपचार कठीण व महाग होतात
मानसिक ताण वाढतो
तज्ञ सांगतात की “Short-term भीतीमुळे आपण टेस्ट टाळतो, पण long-termमध्ये धोका वाढतो.”
डॉक्टरांना भीती वाटत आहे असं सांगा
त्यांनी दिलेल्या प्लॅननुसार टेस्ट करून घ्या
रिपोर्टची वाट पाहताना काय करायचं ते आधी ठरवा
जर FOFO मोठ्या चिंतेमुळे होत असेल, तर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) उपयुक्त ठरू शकते. अनेक टेस्ट असतील तर एकाच दिवशी करा यामुळे मानसिक ताण कमी होतो. तसेच सपोर्ट सिस्टीम तयार ठेवा. कोणाला तरी सोबत घेऊन जा. टेस्ट झाल्यावर स्वतःला छोटीशी ट्रीट द्या यामुळे भीती कमी होण्यास मदत मिळते.