Waking up early benefits 
आरोग्य

Waking up early benefits: सकाळी लवकर उठणं ही केवळ चांगली सवय नसून, आरोग्यासाठी नैसर्गिक औषध आहे, जाणून घ्या कसे

morning routine health benefits: वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सकाळचं वातावरण म्हणजे संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायी असतं.

मोनिका क्षीरसागर

सकाळी लवकर उठणं ही फक्त शिस्तबद्ध सवय नाही, तर शरीरासाठी आणि मनासाठी नैसर्गिक औषध मानलं जातं. वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सकाळचं वातावरण म्हणजे संपूर्ण शरीरासाठी ‘Reset’ बटनसारखं आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठणं हे मानवी आरोग्यासाठी नैसर्गिक औषधच आहे, चला जाणून घेऊया याविषयी

लवकर उठण्याचा आरोग्याला कसा आणि काय फायदा होतो

1. डायबेटीस नियंत्रण सुधारते, वजन कमी होते

सकाळच्या वेळेत शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जास्त असते. त्यामुळे साखर अधिक प्रभावीपणे वापरली जाते. सकाळी चालणं आणि सौम्य व्यायाम केल्याने glycemic variability कमी होतो. लवकर उठून चालणं + पाणी + व्यायाम = रोजचं डायबेटीस नियंत्रण हे सूत्र नक्की लक्षात ठेवा.

2. हृदयासाठी दिलासादायक सुरुवात

सकाळी चालणं किंवा ध्यान करणं parasympathetic system सक्रिय करतं. यामुळे रात्रीचा ताण (sympathetic overdrive) कमी होऊन रक्तदाब आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. लवकर उठणं म्हणजे हृदयासाठी नैसर्गिक संरक्षण आहे.

3. शरीराचं नैसर्गिक घड्याळ संतुलित होतं

लवकर उठल्याने Melatonin-Cortisol rhythm योग्य पद्धतीने कार्यरत राहतो. झोप, जेवण, औषधं यांचा वेळेवर परिणाम होतो. वेळेवर झोपणं-उठणं म्हणजे मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे होय.

4. मेंदू तल्लख आणि विचार स्पष्ट

सकाळी उठल्यावर cognitive clarity जास्त असते. यामुळे brain fog कमी होतो, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढतं. रोज सकाळी अर्धा तास स्वतःसाठी देणे म्हणजेच मानसिक शांतता अनुभवणे.

5. मूड, झोप आणि ऊर्जा संतुलित राहते

सकाळी नैसर्गिक Cortisol spike झाल्यास दिवसभर उत्साह टिकतो. रात्री Melatonin योग्य वेळी वाढल्याने शांत झोप मिळते. लवकर उठणं म्हणजेच चांगली झोप आणि चांगलं आरोग्य होय. “सकाळी लवकर उठणं म्हणजे आजारांचं प्रतिबंधक औषध आहे. औषधांपेक्षा रूटीनमध्ये बदल अधिक परिणामकारक ठरतो” असे देखील तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT