Healthy morning drink| जिरे की बडीशेप? सकाळची सुरुवात कोणत्या पाण्याने कराल?

मोनिका क्षीरसागर

जिरेपाणी सकाळी घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि फुगणे कमी होते.

त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतात.

वजन कमी करायचं असल्यास जिरेपाणी अधिक फायदेशीर ठरतं.

बडीशेपपाणी घेतल्यास आम्लपित्त व जळजळ कमी होते.

ते थंडावा देतं आणि तोंडाला येणारा दुर्गंधही घालवतो.

डोळ्यांची जळजळ, उष्णतेमुळे होणारी चिडचिड यावर बडीशेपपाणी उपयोगी आहे.

जिरेपाणी ‘डिटॉक्स’साठी, तर बडीशेपपाणी ‘कूलिंग’साठी अधिक प्रभावी मानलं जातं.

दोन्ही पाण्यात औषधी गुणधर्म असून, तुमच्या गरजेनुसार निवडणं महत्त्वाचं आहे.

त्यामुळे सकाळची सुरुवात जिरे की बडीशेप यावर नाही, तर तुमच्या शरीराच्या गरजेनुसार करा.

येथे क्लिक करा...