केस गळती ही आजकाल बहुतेक स्त्रिया आणि पुरुष यांना भेडसावणारी सामान्य समस्या बनली आहे. तणाव, चुकीचा आहार, हार्मोन्स, वंशपरंपरा, हवामान अशा अनेक कारणांमुळे केस गळतात. मात्र नियमित आणि योग्य पद्धतीने तेल लावल्यास ही समस्या खूप अंशी टाळता येते.
नारळ तेल: केसांच्या मुळांपर्यंत पोचून मजबूती देतं.
कॅस्टर तेल (एरंडेल): रक्ताभिसरण वाढवून केस वाढीस चालना देतं.
आर्गन तेल: अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने भरलेलं, केसांना चमक आणि मजबूती देतं.
बदाम तेल: व्हिटॅमिन डी आणि ई युक्त, केसांची मुळं मजबूत करतं.
आवळा तेल: व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे केस गळती कमी करतं आणि केस काळेभोर राहतात.
थोडं गरम केल्याने तेल स्कॅल्पमध्ये खोलवर शोषलं जातं. पण जास्त गरम केल्यास स्कॅल्पला इजा होऊ शकते. तेल फक्त कोमट असावं.
केस विभागून बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने तेल लावा. झपाट्याने गळणाऱ्या भागांवर अधिक लक्ष द्या. सुमारे १०-१५ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि झोपही चांगली लागते.
नंतर केसांच्या लांबीतही तेल लावा जेणेकरून संपूर्ण केस शाफ्टला पोषण मिळेल.
साधारणपणे १–२ तास तेल ठेवणं योग्य असतं. अधिक पोषणासाठी रात्रीभरही ठेवू शकता. पण तेलकट स्कॅल्प असलेल्या लोकांनी जास्त वेळ टाळावं.
कोमट पाण्याने केस ओले करून सौम्य, सल्फेट फ्री शॅम्पू वापरा. जास्त तेल लावल्यास २–३ वेळा शॅम्पू करावा लागू शकतो. शेवटी केसांना कंडिशनर लावा.
दर आठवड्यात किमान एकदा तेल लावावं. सातत्य ठेवल्यास केस मजबूत, दाट आणि निरोगी बनतात.
प्रोटीन, लोह, झिंक, व्हिटॅमिन A, C, D, E, आणि B-कॉम्प्लेक्स असलेले पदार्थ खा. पुरेसं पाणी प्या, तणाव कमी करा, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या.